आरोग्यनामा ऑनलाइन – अकाली केस पांढरे होण्याची समस्या सध्या वाढली आहे. तारूण्यातच केस पांढरे झाल्याने सध्या महिलांसह पुरूषसुद्धा विविध प्रॉडक्टस वापरताना दिसतात. परंतु, या प्रॉडक्ट्स उपयोग न झाल्याने अनेकांची निराशा होते. केस पांढरे होण्याची विविध कारणे आहेत. अनुवंशिकता, एखादा आजार, मानसिक ताण, जीवनशैली ही कारणे या समस्येमागे असू शकतात. या समस्येवर काही रामबाण आयुर्वेदिक उपाय असून त्यांची माहिती घेवूयात.
हे उपाय करा
* दोन ग्लास पाण्यात चार चमचे चहापत्ती आणि थोडे मीठ टाकून उकळा. पाणी कोमट झाल्यानंतर त्याने डोके धुवून घ्या.
* आवळ्याचे तुकडे खोबरेल तेलात काळे होईपर्यंत उकळून घ्या. हे थंड झाल्यानंतर गाळून डोक्याला लावा.
* आठवड्यातून एकदा शुद्ध तुपाने डोक्याची मसाज करा. केस धुताना शाम्पू अथवा साबण लावू नका.
* पंचवीस ते तीस कडीपत्ते घेवून खोबरेल तेला मध्ये गरम करा. ही पाने जळाल्यावर थंड करून तेल केसांना लावा.
* कच्च्या कांद्याचा रस काढून घ्या. यामध्ये समप्रमाणात खोबरेल तेल मिसळून केसांच्या मुळांवर मसाज करा.
वयाच्या पंचेचाळिशीत मलायका कशी आहे फिट, जाणून घ्या तिचा ‘डाएट प्लॅन’
फालूदा आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
द्राक्षांची कुल्फी : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
अद्रकाचे ‘हे’ घरगुती उपाय माहिती नसतील तुम्हाला, अवश्य ट्राय करा
व्हॅनिला आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
लावा टोमॅटो पेस्ट, कोंडा काही दिवसांतच होईल दूर
टरबूज आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी