आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण सुंदर असावे प्रत्येकाला वाटत असते. त्याबरोबर आपण तसे प्रयत्न देखील करत असतो. चेहऱ्याच्या बाबतीत सर्तक असणाऱ्या मुली किंवा महिला अनेक वेळा त्याच्या ओठांच्या सौदर्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ओठांवरील त्वचा निघणे, ओठ कोरडे पडणे किंवा ओठांचा काळेपणा या समस्या निर्माण झाल्याचे पहायला मिळते. यापासून सुटका करण्यासाठी हे घरगुती उपाय करा…
१) शुगर स्क्रब….. चमचा साखरेमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकावे. त्यानंतर ३ ते ४ मिनीटे ओठांवर स्क्रब करावे. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा प्रयोग करावा यामुळे ओठांवरील मृत त्वचा निघून जाते आणि स्क्रब आपल्या ओठांना एक्सफोलिएट करत.
२) लिंबू आणि मध…. एक चमचा लिंबाच्या रसामध्ये १ ते २ थेंब मध टाकावे हे मिक्षण एकजीव करुन दहा मिनीटे ओठांवर लावा. त्यानंतर गार पाण्याने ओठ पुसून घ्या. हा प्रयोग दिवसांतून दोन वेळा करावा. लिंबू आणि मधामध्ये अॅटीसेप्टीक गुण आणि ब्लिचिंग एजेंट असते. त्यामुळे मध लिंबाचा लेप ओठांवर लावल्यास ओठांमध्ये आद्रता टिकून राहते. त्यासोबत ओठांवरील काळेपणा दूर होतो.
३) बदामाचे तेल…. बदामाच्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणावर पोषकत्व असतात. त्यासोबत ब्लिचिंग एजेंटदेखील असतात. या ब्लिचिंग एजेंटमुळे ओठांवरील काळे डाग कमी होण्यास मदत होते. बदामाचे तेल हातावर घेऊन हलक्या हाताने ओठांवर या तेलाने मसाज करा. त्यानंतर हे तेल रात्रभर असेच ओठांवर राहू द्या. हा प्रयोग रोज केल्यानंतर त्याचा परिणाम ओठांवर नक्कीच होईल.
४) काकडीचा रस…. काकडीचा बहुविध उपयोग असून अनेकवेळा त्वचेचं सौदर्य टिकवून ठेवण्यासाठी काकडीचा वापर केला जातो. काकडमुळे चेहऱ्याला तजेला मिळतो. त्याप्रमाणे ओठांसाठीदेखील काकडी तितकीच महत्वाची आहे. काकडीचा रस काढून तो १० ते १५ मिनीटे ओठांवर लावून ठेवा. त्यानंतर गार पाण्याने ओठ धुवा. हा प्रयोग दिवसातून २ वेळा करावा. काकडीमध्ये ब्लिचिंग आणि हायड्रेटिंगची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे ओठांवरील काळेपणा दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. ओठांवरील आद्रताही कायम राहते.