आरोग्यानामा ऑनलाइन टीम : पांढरे केस काळे करण्यासाठी बाजारांतील कृत्रिम रंग, केमिकल डाय वापरल्यास केसांचे नुकसान होते. परंतु, काही घरगुती उपाय केल्यास पांढरे केस काळे होऊ शकतात. केस काळे होण्यासाठी कोणते उपाय करावेत, ते जाणून घेवूयात.
हे उपाय करा
१ गायीच्या कच्च्या दुधाने केस धुतले तर केस काळे होण्यास मदत होते.
२ कच्चा आंबा, आंब्याची पाने आणि थोडे तेल मिश्रित करा. हे मिश्रण थोडावेळ उन्हात ठेवा. ही पेस्ट केसांवर लावा.
३ कांदा कापून तो नियमीतपणे केसांवर चोळा. कांद्या पेस्टही लावू शकता.
४ अर्धा लिटर पाण्यात दोन चमचे आवळा पावडर टाका आणि त्यात लिंबाचा रस टाका. हे मिश्रण केसांवर लावा.
५ आठवड्यातून एकदा तूपाने केसांची मालिश करा.
Visit : arogyanama.com