आरोग्यानामा ऑनलाईन टीम : खरबूज हे फळ आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे. यात भरपूर प्रमाणात पोषणतत्वे असतात. तसेच यामध्ये जीवनसत्त्वे आणि क्षाराचे प्रमाण जास्त असल्याने शरीराशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. खरबूज खाल्ल्याने पचनसंस्था उत्तम राहते, कर्करोगापासून बचाव होतो. खरबूज खाण्याचे कोणते आरोग्यदायी फायदे आहेत, ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ खरबुजमधील एंडीनोसीन तत्त्वामुळे शरीरात रक्ताची गुठळी वा डाग होत नाही.
२ रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
३ हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो.
४ किडनी समस्येतील रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.
५ लिंबाच्या रसाबरोबर सेवन केल्यास युरिक अँसिडशी संबंधित समस्या दूर होते.
६ त्वचा नितळ होते.
७ यातील कोलाजेन तत्त्वामुळे त्वचेला सौंदर्य प्राप्त होते.
Visit : arogyanama.com