आरोग्यनामा ऑनलाइन – वजन कमी करण्यासाठी सध्या गोलो डाएट खुपच चर्चेत आहे. 2016 मध्ये गोलो डाइट सर्वात जास्त सर्च केले गेले. यात वजन कमी करण्यासाठी 30-, 60- किंवा 90 दिवसांचा डाएटिंग प्लॅन आहे. हे डाएट तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावे.
गोलो डाएट काय आहे
द हेल्थलाइननुसार, गोलो डाएट वजन कमी करण्यासाठी इन्सुलिन लेव्हल नियंत्रित करण्यावर केंद्रित आहे. हे हार्मोन लेव्हल नियंत्रित करून चयापचय वाढवून वजन कमी करते. हे डॉटर आणि फार्मासिस्टच्या एका टीमने विकसित केले होते. यात आरोग्यदायी वस्तूंचे सेवन करणे आणि व्यायाम वाढवणे यावर भर आहे.
गोलो डाएटचे फायदे
* वजन कमी होते.
* रक्त शर्करा स्तरात सुधारणा होते.
* शरीराला सर्व आवश्यक व्हिटॅमिन, खनिज आणि अँटीऑक्सिडेंट प्राप्त होते.
गोलो डाएटमध्ये काय खाऊ शकता
यामध्ये प्रोटीन, कार्ब्स, भाज्या आणि हेल्दी फॅटची आवश्यकता असते. दिवसात तीनवेळा खाऊ शकता आणि प्रत्येक पदार्थाची 1-2 सर्व्हिंग झाली पाहिजे. मात्र, एक्सरसाइज केल्याने जास्त भूक लागू शकते आणि अशावेळी अतिरिक्त खाणे टाळले पाहिजे.
प्रोटीन : अंडे, मांस, चिकन, समुद्री मासे, नट, डेयरी उत्पादने.
कार्ब्स : जांभूळ, फळे, बटर, स्क्वॅश, गोड बटाटे, सफेद बटाटे, सफरचंद, कडधान्य.
भाज्या : पालक, केळे, ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राउट्स, कोबी, ओवा, काकडी, दोडका.
हेल्दी फॅट : जैतूनचे तेल, खोबरेल तेल, नट, चिया बी, सूर्य फुलाचे बी, शेंगदाणे.