‘सॉक्स’ घालून झोपण्याचे फायदे अन् तोटे ! जाणून घ्या

socks
August 5, 2020

आरोग्यनामा टीम- काही लोक हिवाळ्यात सॉक्स घालून झोपतात. काहींना मात्र झोपताना सॉक्स घालायला आवडत नाही. आज आपण याचेच फायदे, तोटे जाणून घेणार आहोत.

1) रक्तप्रवाह सुधारतो – सॉक्स घालून झोपल्यानं शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहतो. यामुळं ऑक्सिजनचा प्रवाहदेखील चांगला राहतो. याचा स्नायू, फुप्फुसं आणि हृदयाचे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप फायदा होतो.

2) थर्मोरेग्युलेशन – सॉक्स घालून झोपल्यानं शरीराच्या तापमान नियंत्रणाला खूप फायदा होतो. खास बात अशी की, थंडीच्या दिवसात जर सॉक्स घालून झोपलं तर थंडीचा त्रासही जाणवत नाही.

3) रायनॉड – हा असा आजार आहे ज्यात तुमची हाताची किंवा पायाची बोटे सुन्न होतात. कारण पाय गारठलेले असतात. यामुळं गंभीर समस्या येण्याचीही शक्यता असते. काही वेळेस हाता-पायांची बोटं वाकडी होतात. अशात लकव्या सारखी स्थितीही उपस्थित होऊ शकते. झोपताना जर सॉक्सचा वापर केला तर याचा खूप फायदा होतो.

4) हॉट फ्लॅशेस – रजोनिवृत्तीची वेळ येते तेव्हा महिलांना हा त्रास जाणवतो. यामुळं हार्मोन्समध्ये बदल होत असतो. अशात अनेक महिलांना लवकर झोप येत नाही. सॉक्स घालून झोपलं तर ही समस्या दूर होते.

मोजे घालून झोपण्याचे तोटे – याचे जसे काही फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत.

1) रक्तप्रवाहावर परिणाम – सॉक्स घालून झोपल्यानं रक्तप्रवाहावर जसा सकारात्मक परिणाम होतो त्याप्रमाणे हा रक्तप्रवाह असुरळीतही होऊ शकतो. जर तुमचे मोजे घट्ट असतील तर पायांच्या नसांना रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही.

2) स्वच्छता – मोजे घालून झोपल्यानं अनेकदा ऑक्सिजन नीट न पोहोचल्यानं इंफेक्शन किंवा दुर्गंधीचा धोका होऊ शकतो. त्यामुळं झोपताना जर मोजे घालत असाल तर रोज ते स्वच्छ धुतलेले असावेत. मोजे घातल्यानं हवा खेळत राहत नाही. परिणामी ओव्हरहिटींगची शक्यता असते.