पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – सध्या अनेकांमध्ये आढळणारा आजार म्हणजे मानेच्या मणक्याचा किंवा कंबरेच्या मणक्याचा आजार हा आजार अगदी लहान मुलांपासून तर प्रौढांपर्यंत अनेकांमध्ये आढळतो. सध्याची बदलती जीवनशैली, पाठीवर दप्तराचे ओझे, खूप लांबचा प्रवास करणे, किंवा खूप वेळ ऐकाच जागेवर बसने. यामुळे हा आजार आता कोणालाही होत आहे. त्यामुळे अनेकजण या आजराला खूप वैतागले आहेत. परंतु , सध्या सर्व आजारावर उपचार उपलब्ध आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. मणक्याच्या आजारावर खालील पद्धतीने जर उपचार केले. तर तो आजार नियंत्रणात येऊ शकतो.
या आजराची कारणे खालीलप्रमाणे
१) सध्याच्या युगामध्ये जो व्यायाम करतो. तोच निरोगी असल्याचे दिसून येते. त्यामुळे रोज व्यायाम केला नाही तर हा आजार होऊ शकतो.
२) अनेकांना दिवसभर खुर्चीवर बसून काम करावे लागते. आणि ते काम करताना नीट बसले नाही तर त्यांना मणक्याचा आजार होऊ शकतो.
३) अनेकांना पुढे वाकून बसण्याची सवय असते. त्या सवयीमुळे हा आजार होण्याची दाट शक्यता असते.
४) काही जण चालतानाही वाकून चालतात. मग पाठ सरळ राहत नाही. त्यामुळे त्यांना मणक्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते.
५) काही जण तासन-तास मानवर करून टीव्ही पाहत असतात त्यामुळे त्यांच्या मानेवर ताण येऊन हा आजार होतो.
६) काहींना कामासाठी खूप लांबचा प्रवास करावा लागतो. त्यामुळेही हा आजार उद्भवतो.
७) मणक्याच्या दुखण्यासाठी शलआसन, नौकासन, धनुशासन, भुजंगासन आणि वृक्षासन करा.
या आजारावर घरगुती उपाय
हा आजार कमी करण्यासाठी पाठीचे व पोटाचे व्यायाम करणे तसेच योगासने करणे या उत्तम उपाय आहे. कुठेही बसताना पाठीचा कणा ताठ ठेवून बसले तर हा आजार उद्भवणार नाही. तुम्ही जर दिवसभर खुर्चीवर बसून काम करत असाल तर दर अर्ध्या तासाने उठून चक्कर मारा. म्हणजे हा त्रास कमी होईल. याशिवाय आयुर्वेदात सांगितलेली पंचकर्मे केल्यास मणक्याची झीज कमी होते. यामध्ये मुख्यत: अभ्यंग, पिंडस्वेद, पत्रफेडरली स्वेद या केरळीयन मसाज पद्धतीमुळे पाठीचे व मानेचे स्नायू मजबूत होतात व दुखणे कमी होते.मण्याबस्ती व कटिबस्ती या विशिष्ट पंचकर्माने मणक्याचे दुखणे कमी होते. शिवाय बस्ती व नस्य या पंचकर्माने शरीरातून हाडांची, नसांची सुज व झीज कमी होते.
मणक्याचा त्रास असणाऱ्यांनी मानेचा व कमरेचा योग्य पट्टा स्पोर्ट म्हणून वापरावा. मन शांत ठेवावे. मन शांत नसेल तर मानेचे, पाठीचे स्नायू ताठरतात. एसी किंवा फॅनखाली झोपू नका. वेदनेकडे लक्ष न ठेवता दीर्घ श्वास घ्या. व हळूहळू सोडा, ध्यानधारणा करा. या उपाययोजनेनेही दुखणे कमी होते. शरीराला तिळाच्या तेलाने नियमित मालीश केली तर मणक्याचे दुखणे नियंत्रणात येऊ शकते.