आरोग्यनामा ऑनलाईन टीम – भारतात हळद ही प्रत्येक घरात वापरली जाते. विविध पदार्थात वापरली जाणारी हळद अतिशय औषधी आहे. आयुर्वेदातही हिचे महत्त्व सांगितले गेले आहे. हळदीत अँटीबाक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीव्हायरल घटक विविध आजारांना दूर ठेवतात. आहारात नियमित हळदीचा समावेश केल्यास वजन जलदगतीने कमी होते, असे संशोधनात आढळून आले आहे. वजन कमी करण्यासाठी हळद उपयोगी असल्यासंबंधी ईरानच्या शाहिद सादौघी यूनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सने संशोधन केले आहे.
हे आहेत फायदे
* हळदीतील तत्व कँसरच्या पेशी वाढू देत नाही.
* हळदीच्या सेवनाने शरीरातील इन्सूलिनची पातळी नियंत्रणात राहते.
* यामुळे इन्फेक्शन टाळता येते.
* हळद शरीरात जमा झालेली चरबी कमी करते. नियमित एक लहान चमचा हळद खावून पाणी प्यायल्यास वजन कमी होते.
* हळदीचे सेवन केल्यास सांधेदुखी कमी होते.