केवळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्य वाढवण्यासाठीही ‘सोयाबीन’ उपयोगी ; जाणून घ्या 6 फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शरीराच्या वाढीसाठी प्रोटीन महत्वपूर्ण घटक आहे. सोयाबीन हा प्रोटीनचा मोठा स्त्रोत आहे.  सोयाबीनमध्ये डाळीच्या दुप्पट प्रमाणात प्रथिने असतात.  प्रोटीन तुमच्या भूक हार्मोन्सला नियंत्रणात आणतात. प्रोटीन शिवाय सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन आणि खनिज मोठ्या प्रमाणात असतात. केवळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्य वाढवण्यासाठीही सोयाबीन फायदेशीर आहे. सोयाबीनच्या नियमित सेवनाने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. सोयाबीनची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात. त्यासाठी सोयाबीन पाण्यात भिजवा. त्याची पेस्ट बनवून  १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतील. सोयाबीनमध्ये असलेल्या प्रोटीनमुळे केस काळेभोर आणि घनदाट होतात. जाणून घ्या सोयाबीनचे इतरही फायदे –

 सोयाबीनचे  फायदे –

सोयबीनमध्ये असणारी कबोर्दके रक्तातील कोलेस्ट्रोल कमी करतात. यामुळे रक्तातील विषारी किंवा कर्करोगजन्य पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात.

सोयबीनमुळे  रक्तातील साखरेचं प्रमाण तर नियंत्रणात येतंच पण मधुमेहात असणारा हृदय विकार आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी करतं. टाईप २ डायबेटीसमध्यही सोयाबीन फायदेशीर  आहे.

सोयाबीनमधील  सोया-लेसिथीनमुळे रक्तातील चिकटपणा कमी होतो. लोहामुळे रक्त वाढतं.

सोयाबीनमधील कॅल्शियममुळे दात आणि हाडांचं मजबूत होतात.  सोयाबीनचा नियमित वापर केल्याने हाडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो.

सोयाबीनमधील कोलीनमुळे स्मरणशक्ती उत्तम राहते.

कधी कधी काही मुलांना किंवा रुग्णांना दुध पचत नाही. अशावेळी मुलांना  सोयाबीनचे दुध देता येऊ शकते. सोयाबीनमध्ये लॅक्टोज नसल्याने ते नीट पचते.