आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मुळा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती असून मुळा हा एक प्रकारचा कंद आहे. बारा महिने उपलब्ध असणारी ही भाजी आहे. आरोग्यासाठी मुळा खुप गुणकारी आहे. मुळ्याचे सेवन केल्यास कोणत्याही आजारापासून बचाव करता येतो, असे तज्ज्ञ सांगतात. हृदयरोग किंवा कोलेस्ट्रॉल रुग्णांसाठी मुळ्याचे सेवन लाभदायक आहे. ब्लडप्रेशरचा त्रास असल्यास सॅलड स्वरूपात नियमित मुळा खाणे लाभदायक ठरते. यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
हे आहेत खास फायदे
मुत्रविकार
मुळ्याचा रस घेतल्याने लघवी करताना होणारी जळजळ थांबते. तसेच मूत्रविकार व मूत्रपिंडाशी निगडित संसर्गाचा धोका कमी होतो. आतडे, मूत्रपिंड आणि पोटाशी निगडित रोगांची शक्यताही दूर होते.
काविळ
कावीळ झाल्यास जेवणात मुळ्याचा अवश्य समावेश करावा. यामुळे रक्त शुद्ध होते. रक्तात ऑक्सिजनचा पुरवठाही होतो.
पिवळे दात
पिवळे दात पांढरेशुभ्र करण्यासाठी मुळ्याच्या तुकड्यावर लिंबू पिळून तो तुकडा थोडा वेळ चावून थुंकून टाका. या उपायाने दात चमकदार होतील.
लठ्ठपणा
मुळा वजन कमी लाभदायक आहे. जेवताना मुळा खाल्ल्याने लवकर पोट भरते. अतिखाण्यापासूनही बचाव होतो. मुळ्यात जास्त उष्मांकही नसतो.
अपचन
ज्या लोकांची पचनक्रिया व्यवस्थित नाही आणि पोट साफ होत नसेल, तर कच्चा मुळा खावा. मूळव्याध कमी करण्यातही मुळा फायदेशीर आहे.
त्वचाविकार
मुळ्यात असलेल्या क जीवनसत्त्व, फॉस्फरस, झिंक व बी-कॉम्प्लेक्समुळे त्वचाविकार दूर होतात. यामध्ये भरपूर पाणी असल्याने त्वचेचा ओलावा राहतो. तसेच त्वचा कोरडी किंवा निर्जीव होत नाही.