आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सौंदर्य उजळवण्यासाठी अतिशय सोपे उपाय आहेत. हे उपाय केल्यास त्वचा आणि केसांवर चांगला परिणाम दिसून येऊ शकतो. यापैकीच एक अतिशय सोपा आणि कमी वेळात करता येणारा उपाय हा कच्च्या दुधाचा वापर करून करता येतो. अंघोळीच्या पाण्यात थोडेसे कच्चे दूध मिसळले तरी त्वचा आणि केस निरोगी रहातात. या उपायाच्या फायद्यांविषयी सविस्तर घेवूयात.
हे आहेत फायदे
१) रंग गोरा होतो. सन टॅनिंग दूर होते.
२) केसांची शायनिंग वाढते.
३) यातील लेक्टिक अॅसिड, व्हिटॅमिन ए मुळे त्वचेमध्ये ओलावा राहतो.
४) ग्लो वाढतो. कोरडेपणा दूर होतो.
अशी घ्या काळजी
* आहारात केळी, दही, दूध आणि बीन्स घ्या. यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहतात.
* ताज्या दूधाचा वापर करा.
* त्वचा आणि केसांवर केमिकलचा वापर करु नका.
* तीव्र उन्हात जाणे टाळावे.