आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पिकलेल्या केळ्यांप्रमाणेच कच्च्या केळ्याचे सेवनही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर म्हटले जाते. पोटॅशियम आणि क्षार मुबलक असणारे हे फळ पचण्यास हलके आहे. याच्या सेवनाने शरीरामध्ये त्वरित उर्जा उत्पन्न होत असते. जाणून घ्या कच्ची केळी खाण्याचे फायदे –
वजन कमी करते –
कच्ची केळी वजन घटण्यास मदत करते. कच्ची केळी हा तंतूमय पदार्थांचा महत्त्वाचा स्त्रोत असल्यामुळे शरिरातील अनावश्यक फॅट आणि अशुद्धी स्वच्छ होण्यास मदत मिळते. तसेच कच्च्या केळ्यामध्ये असलेल्या फायबर्समुळे शरीरातील अनावश्यक फॅट सेल्स काढून टाकायला मदत होते.
भूकेवर नियंत्रण मिळवता येते –
कच्ची केळी खाल्ल्यामुळे लागणारी भूक नियंत्रणात येते. कच्च्या केळ्यांमधील फायबर, इतर पोषण गुणांमुळे भुकेवर ताबा मिळवता येतो.
डायबिटीसवर नियंत्रण –
डायबिटीसचा त्रास असणाऱ्या रुग्णांनाही कच्ची केळी फायदेशीर ठरू शकते. जर तुमचा डायबिटीस प्राथमिक स्टेजमध्ये असेल तर कच्ची केळी खायला सुरुवात करा. कच्च्या केळ्यामुळे डायबिटीसवर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते. तसेच शरीरातील ब्लड-शुगरची पातळी नियंत्रणात राहते.
पचनक्रिया सुधारते
कच्च्या केळ्याच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुधारते.
थकवा कमी करते
कच्च्या केळ्यांमध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असतं, ज्यामुळे पाचन क्षमता चांगली होते. दिवसभर थकवा जाणवत नाही
कॅन्सरचा धोका कमी
याबरोबरच कच्च्या केळ्यामुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
हाडं मजबूत होतात
यामध्ये असलेल्या कॅल्शिअममुळे हाडं मजबूत होतात.