आरोग्यनामा ऑनलाईन टीम- प्रत्येकाच्या घरात जेवणाची चव वाढवण्यासाठी पुदिनाच्या पानांचा वापर केला जातो. पुदिनाच्या पानांमध्ये विविध औषधीय गुणधर्म आढळतात. तसेच अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असल्यामुळे याचा वापर दुर्गंधी दूर करण्यासाठीही होतो. अशा अनेक प्रकारचे फायदे या पुदिन्याचे आहेच पण तुमच्या त्वचेसाठीही पुदिना खूप उपयुक्त आहे. पुदिन्याची पाने खाल्ल्याने त्वचेसंबंधित समस्या दूर होतात. तसेच कोणतेही साईडइफेक्टस होत नाहीत. व त्वचेस भरपूर प्रमाणात पोषण मिळते. आणि तुमची त्वचा तजेलदार व सुंदर होते.
१) पुदिन्यामध्ये सॅलिसिक ऍसिड असल्याने चेहऱ्यावरील काळे डाग, मुरूम आणि पिगमेंटेशन सारख्या समस्या दूर होतात. याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चमकही येते.
२) पुदिन्यामध्ये दही आणि मध घालून याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होतात. जास्त वयाच्या व्यक्तींनी पुदिन्याचा वापर करावा.
३) पुदिना थंड असल्याने पुदिन्यामुळे दाह कमी होतो. व चेहऱ्यातील ओलावा टिकून राहतो. त्यामुळे त्वचा तजेलदार राहते. काकडी आणि पुदिन्याच्या पानांची पेस्ट करून चेहऱ्यावर लावावी. एका आठवड्यात बदल दिसेल.
४) पुदिन्याच्या पानाचा रस प्यायल्याने किंवा तो चेहऱ्यावर लावल्याने हि पाने क्लिनझींग चे काम करतात यामुळे चेहरा क्लीन होतो व तेजस्वी बनतो.
५) तेलकट त्वचेच्या समस्येवरही पुदिनाची पाने रामबाण उपाय आहे. यात मुलतान माती मिक्स करून लावावी.
६) पुदिन्याच्या पानांसोबतच मध आणि गुलाब पाणी मिक्स करून लावावे. यात ph लेव्हल जास्त असल्याने हे तुमचे सौंदर्य जास्त खुलते.