ऑलिव्ह ऑइलने कुरुळे केस सरळ होऊ शकतात. ऑलिव्ह ऑइल थोडे गरम करून केसांना लावून मालीश करावी. नंतर टॉवेलने केस ३० मिनिटांनपर्यंत बांधून ठेवावे . केस रात्रभर मोकळे सोडावे. सकाळी उठल्या नंतर केस शाम्पूनी धुवून घ्या. असे आठवड्यातून १ किंवा २ वेळेस करावे. असे केल्याने आपले केस मुलायम आणि दाट होतील .
त्वचेसाठी लाभदायक
आपली त्वचा ड्राय असेल तर ऑलिव्ह ऑइलच्या मालिशने ड्रायनेस दूर होते . त्यासाठी आपल्या चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑइल लावून मालिश करावे . मालिश केल्या नंतर १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.ऑलिव्ह ऑइलमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. जे त्वचेला पुन्हा उजळवण्यात मदत करते.
हाडे मजबुतीसाठी
जी लोकं ऑलीव्ह ऑइल मध्ये बनवलेले पदार्थ खातात त्या लोकांचे हाड मजबूत असतात . आणि त्या लोकांच्या रक्तामध्ये ओएस्तोकल्सिन जास्त प्रमाणात निर्माण होते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. ऑलिव्ह ऑइलचा वापर जेवणात तसेच शरीराची मालिश करण्यासाठीही करू शकता.
पायांना पडलेल्या भेगांसाठी गुणकारी
अधिक तर महिलांना पायात भेगा पडण्याची समस्या असते. जर अशा भेगांवर ऑलिव्ह ऑइलने मालिश केल्यास याचा भेगांवर फायदा होतो. ऑलिव्ह ऑइलमध्ये असणाऱ्या मॉइश्चराइजिंग गुणामुळे पायांच्या टाचेची कठीण त्वचा नरम होण्यास मदत होते आणि टाचांना भेगा पडत नाहीत.
डिप्रेशन कमी करण्यात मदत
ऑलिव्ह ऑइलच्या सेवनाने डिप्रेशन कमी होण्यात मदत होते. ऑलिव्ह ऑइलमध्ये सेरोटोनिन घटकामुळे न्यूरोट्रांसपीटरचा स्तर वाढवतो ज्यामुळे तणावाचा स्तर कमी होतो.