आरोग्यनामा ऑनलाईन टीम- वाढत्या प्रदूषणामुळे सध्या मुलींमध्ये केसगळतीच्या तक्रारी ऐकायला मिळतात. त्यातच केसांना लावण्यासाठी मिळणाऱ्या विविध तेल आणि शॅम्पूमुळे केसगळतीचे प्रमाण वाढले आहे. मेथीचे दाणे हा केसगळतीवर रामबाण उपाय आहे. कारण मेथीचे दाणे केसांना उत्तम पोषण देऊ शकतात. आणि इतर आजारवरही मेथी अत्यंत उपयुक्त आहे.
१) पिंपल्स आणि ब्लॅकहेड ट्रीडमेंटसाठी मेथीचे दाणे फायदेशीर असतात. त्यासाठी मेथीच्या दाण्यांची पेस्ट करून घेणे. आणि त्यात थोडे मध एकत्र करून घेतल्यानंतर हे मिक्सचर रात्री झोपण्याच्या आधी पिंपल्सवर लावावे. आणि सकाळी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घेणे. हा उपाय नेहमी केल्यानंतर तुम्हाला फरक दिसेल.
२) केसात कोंडा होणे ही किरकोळ समस्या मानली जाते. डोक्यावरची त्वचा कोरडी किंवा डेड स्किन सेल्समुळे देखील डॅड्रफ होतो. कोंड्यापासून सुटका होण्यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट करून घ्या. ही पेस्ट आणि दही एकत्र करून स्कॅल्प आणि केसांच्या मुळापर्यंत लावा. त्याचबरोबर मसाज देखील करा. मग 30 मिनिटाने केस धुऊन घ्या.
३) मेथीच्या दाण्यापासून रक्तातील साखर कंट्रोल होण्यास देखील मदत होते. मधुमेह झालेल्यांनी मेथीचे सेवन केल्यामुळे त्यांना खूप फायदा झाला आहे. मेथीमध्ये असलेल्या अमीनो असिड तत्व पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिनचे स्राव वाढवितो. तो शरीरामधील रक्तातील साखर समप्रमाणात आणतो. यासाठी मेथीचे दाणे पाण्यात रात्रभर भिजत घालून सकाळी त्याचे पाणी गाळूण प्यायल्याने काही प्रमाणात मधुमेह कमी होता.
४) मेथीचे सेवन केल्यामुळे किडनी चांगली रहाते. मूतखडासाठी मेथी हा फायदेशीर उपाय मानला जातो. त्यामुळे मूतखडा हा लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडतो. तसेच मेथी दाणे एक छोटा चमचा, लिंबू रस आणि मध खाल्याने ताप काही प्रमाणात कमी होतो.