लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे
आरोग्यनामा ऑनलाईन टीम- लिंबूपाणी पिण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. यामुळे त्वचेची सुंदरता वाढण्यास मदत होते. शरीराला उर्जा मिळते. तसेच याने पचन संस्था देखील उत्तम राहते. लिंबूपाण्याचा दैनंदिन जीवनात पेयजलांमध्ये समावेश केलाच पाहिजे.
१. रोगप्रतिकारशक्ती वाढते :
लिंबू पाणी पिण्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. यामुळे अॅसिडिटी-गॅसेसच्या त्रासापासून आराम मिळतो. याने पोटात होणा-या जंतुसंसर्गापासून रक्षण होण्यास मदत होते. लिंबात व्हिटॅमिन सी आणि एसकॉरबिक अॅसिड असते. याने पोट साफ राहण्यास मदत होते. यामध्ये अॅन्टी-इन्फ्लेमेटरी तत्व असल्याने पोटात असणा-या बॅक्टेरियापासून रक्षण होते तसेच सर्दी-खोकला होत नाही.
२. पचनक्रिया सोपी होते :
लिंबात अशी बरीच तत्वे उपलब्ध असतात ज्यामुळे पचनसंस्थेमधील टॉक्सिन्स (विषारी तत्व) नाहीसे होतात. यासाठी रोज लिंबू पाणी प्यायले पाहिजे. लिंबू पाण्यामुळे पोटाच्या तक्रारींपासून आराम मिळतो.
३. जखम लवकर भरते :
लिंबात भरपूर प्रमाणात एसकॉर्बिक अॅसिड असते. त्यामुळे अंग भाजल्यावर किंवा कापल्यानंतर आणि एखादी जखम झाल्यानंतर ती लवकर भरुन निघण्यासाठी लिंबाचा फायदा होता. लागलेल्या ठिकाणी लिंबाचे 2 थेंब टाकल्यास लवकर आराम मिळतो.
४. ऊर्जावृद्धी :
लिंबात जीवनसत्वे आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असल्याने लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील उर्जेचे प्रमाण वाढते. साइट्रस असणारे फळे (आंबट फळे)शरीरातील उर्जा वाढवण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे शारीरिक व मानसिक थकवा जाणवत नाही.
५. पोट साफ राहते :
लिंबात अनेक तत्व उपलब्ध असतात ज्यामुळे शरीरातील खास करुन पोटातील विषारी तत्व नाहिसे होतात. लिंबू पाणी पिण्याने शरीरातील रक्त साफ होते. यूरिनशी निगडित समस्येपासून आराम मिळण्यासाठी लिंबू पाणी पिणे फायद्याचे ठरते.लिंबामुळे पित्त, किडनी स्टोन पासून आराम मिळतो.
६. त्वचा तजेलदार राहते :
लिंबात भरपुर व्हिटॅमिन उपलब्ध असतात. यामध्ये बरेच अॅन्टी-ऑक्सीडेंट्स असल्याने त्वचा नितळ व तजेलदार राहते. यामुळे चेह-यावरील डाग, सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
७. वजन कमी करण्यास मदत :
शरीरातील चरबी कमी करण्यासाठी लिंबाचा फायदा होतो. त्यासाठी कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यावे. यामुळे मेटाबॉलिजम वाढण्यास मदत होते आणि वजन कमी होण्यास सुरुवात होते.