कोमट तेलाने मसाज करा, ‘हे’ आहेत ५ आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केस दाट, लांब आणि शायनी ठेवण्याचे काम तेल करते. केसांची मालिश करण्याचे अनेक फायदे आहेत. केसांसाठी तेल खुप महत्त्वाचे असते. मात्र, कोमट तेलाने मसाज केल्याने केस आणि डोके दोन्हीही मजबूत होते. कोमट तेलाने मसाज केल्याने कोणते फायदे होतात याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

केस गळती थांबते
कोमट तेलाने मसाज केल्याने केस गळणे कमी होते, केस दाट होतात. कोमट तेलाने मसाज केल्याने कोंडादेखील होत नाही.

शांत वाटते
कोमट पाण्याने मसाज केल्याने मन आणि डोके शांत होते.

पोषण मिळते
कोमट तेलाने मसाज केल्याने त्वचेला आतून पोषण मिळते. स्काल्पमध्ये संतुलन टिकून राहते. स्काल्प निरोगी राहते ज्यामुळे केस चांगले राहतात.

केसांची वाढ
केस लवकर वाढवायचे असतील तर कोमट तेलाने केसांची मसाज करा. ब्लड फ्लो चांगला राहतो.

कोरडा स्काल्प
कोरड्या स्काल्पवर सर्वात चांगला आणि फायदेशीर उपाय म्हणजे कोमट तेल आहे. यासाठी हळूहळू कोमट तेलाने केसांची मसाज करा.