आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जर तुम्हाला जेवताना मिरची खाण्याची सवय असेल तर ही बातमी नक्की वाचा. आज आम्ही तुम्हाला मिरचीशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या मिरची खाण्याचे फायदे –
१) भाजीसोबत खाल्ली जाणारी हिरवी मिरची आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मिरचीमध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते.
२) हिरवी मिरची आपल्या पचन तंत्रासाठी खूप लाभदायक आहे. आपल्या अन्नामध्ये फायबर अधिक प्रमाणात आढळते. हिरवी मिरची फायबर पचवण्यास मदत करते.
३) हिरवी मिरची ब्लड शुगर लेव्हल कमी करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी मिरची खाणं गरजेचे आहे.
४) हिरवी मिरची शरीरातील मेद कमी करुन मेटाबॅालिजम वाढवते.
५) हिरव्या मिरच्यामध्ये असलेले पोषक घटक आपल्या शरीराचे बॅक्टेरिया नष्ट करतात.