आरोग्यनामा ऑनलाईन टीम – स्वयंपाकघरात मसाल्याच्या पदार्थांमध्ये लसूण अत्यंत आवश्यक घटक समजला जातो. लसूण केवळ जेवणाची केवळ चव वाढवत नाही तर आरोग्यवर्धकही आहे. जवळपास पाच हजार वर्षांपूर्वी लसूण औषधी म्हणून भारतात वापरण्यात येत होता. खारट रस नैसर्गिकरीत्या असणारा लसूण हा एकमेव कंद आहे. लसूण गोड, खारट, तुरट, कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त असतो.
लसूणाचे औषधी उपयोग –
अनेक पोषक तत्त्वं एकत्र
दररोज लसणाची एक पाकळी खाणे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यातून ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वांसह आयोडिन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी अनेक पोषक तत्त्वं एकत्र मिळतात.
कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते
लसणाचे सेवन कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते. लसणामुळे रक्ताचे शुद्धीकरण होतेच, शिवाय रक्त पातळ होते. त्यामुळे रक्ताच्या गाठी निर्माण होत नाही.
अॅण्टिबॅक्टेरियल
लसणात अॅण्टिबॅक्टेरियल गुण आहेत. म्हणूनच पिंपल्सची समस्या असल्यास लसणाचे सेवन अतिशय गुणकारी ठरते. पिंपल्सवर लसणाची पाकळी लावून हलक्याने रगडल्यास लवकरच आराम मिळतो. लसणाचे तेल तळहात आणि तळपायाला लावल्यास डास जवळ येत नाहीत.
रोगप्रतिकारशक्ती वाढते-
दुधात लसूण उकळवून पाजल्यास लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. लसणाच्या पाकळ्या भाजून खाल्ल्यास लहान मुलांना श्वास घेताना होणारा त्रास दूर होतो. रोज लसणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. हवामान बदलामुळे होणा-या सर्दी आणि खोकल्यावर लसूण टाकलेला चहा गुणकारी आहे.
इन्सुलीनचे प्रमाण वाढविते
लसूण शरीरात इन्सुलीनचे प्रमाण वाढविते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे.
कॅन्सरचा धोका कमी
लसणाचे नियमित सेवन केल्यास कॅन्सरचा धोका कमी होतो.
लोह तयार करण्यात उपयोगी –
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास लसूण खूप फायदेशीर आहे. लसणात लोह असते. रक्त तयार होण्यास लोह आवश्यक असते.
दात दुखीवर उपयोगी
दात दुखत असल्यास लसणाची पेस्ट करून दातांवर ठेवावी. लगेच फरक पडेल.
कान दुखीवर गुणकारी
मोहरीच्या तेलात लसणाच्या पाकळ्या उकळून घ्या. हे तेल कानात टाकल्यास कान दुखण्याचा त्रास कमी होतो
केस काळे करण्यात मदत
लसणाच्या ५ पाकळ्या बारीक करून त्यात थोडे पाणी व मध मिसळावा. हे मिश्रण सकाळी आणि सायंकाळी सेवन करावे. यामुळे पांढरे केस काळे होतील.