आरोग्यानामा ऑनलाईन टीम : अंड्यात भरपूर प्रमाणात पोषकतत्त्व असल्याने अंड्याचे नियमित सेवन केले पाहिजे. परंतु, अंड्याचा नक्की कोणता भाग खावा, याबाबत अनेकजण साशंक असतात. याबाबत तज्ज्ञ सांगतात की, अंड्यातील पिवळा आणि पांढरा हे दोन्ही भाग खुप महत्वाचे असल्याने दोन्ही खावेत. यामुळे स्नायू पेशींना प्रोटीन्स मिळतात. अंड हे प्रोटीनचे उत्तम स्त्रोत आहे. म्हणून रोज किमान एक तरी अंडे खावे. अंडे खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ लवकर भूख लागत नाही.
२ वजन घटवण्यात अंड हे उत्तम आहे.
३ अंड्यातील पोषक तत्त्वांमुळे मेंदूचा विकास होतो.
४ अंड्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
Visit : arogyanama.com