आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आमसूल खाण्याचे अनेक फायदे आहेत. विविध पदार्थांमध्ये आमसूलचा वापर केला जातो. आमसूल अन्नपदार्थांची चव वाढवण्यासाठी उत्तम पदार्थ आहे. शिवाय आमसुलाचे शरीरासाठी अनेक फायदेही आहेत.
मधुमेहावर नियंत्रण
नियमितपणे आमसूल पावडरचा सेवन केल्याने रक्तातील साखरेचा प्रमाण नियंत्रित ठेवण्यात मदत होते. आमसूलमध्ये असणाऱ्या ग्लायसेमिक इंडेक्स आणि पोटॅशियमची मात्रा जास्त असल्याने मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरते.
वजन कमी करण्यास मदत
ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे अशांसाठी आमसूल फायदेमंद ठरू शकते. आमसूल मध्ये असणाऱ्या अँटी ऑक्सिडेंट पचन क्रिया सुधारण्यास मदत करते. ज्यामुळे वजन कमी होण्यात मदत होते. कार्बोहायड्रेटच्या उचित मात्रामुळे वजन कमी करणाऱ्या पदार्थांमध्ये आमसूलचा समावेश असतो.
हृद्यासंबंधी समस्या कमी होतात
हृद्यासंबंधी समस्या दूर करण्यासाठी आमसूल लाभकारी आहे. यामध्ये असणाऱ्या पोटॅशियममूळे हृद्यासंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे आमसूल सेवन उपयुक्त असतो. तसेच आमसूल हार्ट अटॅक सारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्याचे काम करते.
महिलांसाठी फायदेमंद
आमसूल मध्ये आयर्नची मात्रा जास्त प्रमाणात असल्याने महिलांसाठी हे खूप लाभकारी असते. महिलां मध्ये होणाऱ्या अॅनिमिया सारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी याचा फायदा होतो. महिलांच्या शरीरात आयर्नची मात्रा कमी असल्याने हा आजार होऊ शकतो. तसेच मासिक पाळीच्या दरम्यान रक्तस्त्राव झाल्याने शरीरात रक्ताची कमतरता भरून काढण्यात आमसूल फायदेमंद असतो.
दृष्टिक्षेपासाठी उपयुक्त
डोळे हे आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण घटक मानले जाते. आमसूल मध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन इ जास्त प्रमाणात असल्याने डोळ्यांच्या दृष्टीसाठी लाभदायक असते.