आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेक पालक नेहमी लहान मुलांच्या आरोग्याविषयी काळजी करत असतात. परंतु, लहान मुलांना योग्य आहार दिला तर त्यांच आरोग्य सुदृढ राहत त्यामुळे आपल्याला त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज पडत नाही. त्यामुळे मुलांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी घोळ मासा खूप फायदेशीर आहे. त्यामुळे लहान मुलांच्या आहारात घोळ माशाचा समावेश करा.
घोळ मासा लहान मुलांच्या आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे. ते खालीलप्रमाणे :
१) घोळ माश्यातील डीएचए अ अणि ईपीए घटक लहान मुलांच्या आरोग्याला फायदेशीर असतात. घोळ माशाचा जर आहारात समावेश केला तर रक्तदाब नियंत्रणात येतो.
२) या माशात असणारा ओमेगा ३ हा घटक लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी उपयुक्त आहे. यामुळे लहान मुलांची स्मरणशक्ती मजबूत होते. मुबलक प्रमाणात ओमेगा ३ घटक असल्याने मेंदूच्या कार्याला त्याचा उपयोग होतो.
३) तसेच त्वचा सुंदर आणि तजेलदार ठेवण्यासाठी घोळ मासा फायदेशीर आहे.
४) या माशाच्या सेवनाने चेहर्यावर सुरकुत्या पडण्याची समस्या नष्ट होते. आणि त्वचा मुलायम होण्यास मदत होते.
५) घोळ माश्यातील व्हिटॅमिन, खनिज, प्रोटीन घटक डोळ्यांचं आरोग्य जपायला मदत करते.
६) मसल्स टोन करण्यासाठी, त्यांना मजबुती देण्यासाठी घोळ मासा अत्यंत फायदेशीर आहे. याद्वारा शरीराला उत्तम प्रतीच्या व्हिटॅमिन्सचा पुरवठा होतो.
७) घोळ माशाच्या सेवनाने पचनक्रिया ही सुरळीत होते.