‘अशा’ प्रकारची केळी देखील आरोग्यासाठी लाभदायक, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन टीम –
१) केळी हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कोणत्याही ऋतूत हे फळ आपल्याला मिळते. जर तुम्ही ४ दिवस सतत काळे डाग असलेलं केळ खाल्लं तर तुम्ही खूप साऱ्या आजारांपासून लांब राहू शकता. त्यामुळे काळे डाग असलेले केळ जर तुम्ही खाल्लं तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
२) केळ्यामध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे केळी पचायला सोपे असते. त्यामुळे शरीराचे चयापचय बरोबर राहते. केळीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. हे हिमोग्लोबिन वाढवायला पण मदत करते. केळी खाल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
३) केळ्यामध्ये पोटॅशियम जास्त असते आणि सोडियमचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांना डॉक्टर केळी खायला सांगतात जेणे करून त्यांचा रक्तदाब सामान्य व्हायला मदत होते. केळी शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन देत नाही. त्यामुळे तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्यापासून लांब ठेवते.
४) केळ्यावर जास्त काळे डाग पडले की आपण म्हणतो की केळी खराब झालीये. पण अशी केळी जास्त पिकलेली असतात आणि अशी केळी जर तुम्ही खाल्ली तर तुमचा कर्करोगापासून बचाव होतो.
Comments are closed.