आरोग्यनामा ऑनलाइन टीम – योग्य प्रमाणात बीअर घेतल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. उलट ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, असे परदेशातील काही संशोधकांनी केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. बीअर कशाप्रकारे आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते याची माहिती आपण घेणार आहोत. तत्पूर्वी, जे बीअर घेत नाहीत किंवा डॉक्टरांनी बीअर घेण्यास मनाई केली असेल त्यांनी अजिबात बीअर घेऊ नये. हे बीअर पीण्यासाठी प्रोत्साहन बिलकून नाही. पण जे घेतात, त्यांनी योग्य प्रमाणात सेवन केल्यास त्याचे तोटे होण्याऐवजी फायदे होतील, हा यामागील उद्देश आहे.
हृदयविकार
फ्रेंचमधील नागरिक भरपूर फॅट असलेले अन्न सेवन करतात तसेच धुम्रपानही करतात. तरी येथील लोकांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण कमी आहे. कारण ते रेड वाईन सेवन करतात. रेड वाईनमध्ये अधिक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. त्याचप्रमाणे डार्क बीअरमध्येही त्याचे प्रमाण अधिक असते.
कॅन्सर
ओरेगॉन विद्यापीठाच्या डॉ. क्रिस्टोबेल मिरांडा यांनी म्हटले आहे की, बीअरमध्ये कॅन्सरशी लढा देणारी तत्वे आढळतात. एक्झँथॉमॉल हे अँटिऑक्सीडंट कॅन्सरच्या एन्झाइमशी लढा देत असतात.
वजन
बीअर पिणे आणि लठ्ठपणा यात अगदी नाममात्र संबंध असल्याचे संशोधकांचे मत आहे. योग्य प्रमाणात बीअर सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहते, असे युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात नमूद केले आहे.
कॅलरीज
बीअरमध्ये कॅलरीजचे प्रमाण अत्यंत कमी असते. तसेच फॅट्स आणि कोलेस्टेरॉल नसते. पूर्णपणे नैसर्गिक पेय म्हणून बीअर हा एक अत्यंत चांगला पर्याय आहे.
कोलेस्टेरॉल
बीअरमध्ये कोलेस्टेरॉल नसते. ती शरीरातील कोलेस्टेरॉलसाठी लाभदायक असते. काही अभ्यासांनुसार रोज एक बीअर प्याल्याने शरीरातील एचडीएलमध्ये सुमारे ४ टक्के वाढ होते.
आराम
ठरावीक प्रमाणात बीअर घेतल्यास याचा आनंद घेता येऊ शकतो. म्हणजेच मानसिक आराम मिळू शकतो.
बी व्हिटॅमिन
कमी फिल्टर केलेल्या बीअरमध्ये व्हिटामीन बी भरपूर असते, त्यामुळे बीअर ठरावीक प्रमाणात सेवन करणे हे पोषकही ठरू शकते. तसेच हृदयविकाराच्या झटक्यांपासून संरक्षण होते. बीअरमध्ये मॅग्नॅशिअम आणि पोटॅशिअमचे प्रमाणही चांगले असते.
आयुष्यमान
संशोधनानुसार ठराविक मद्यपान करणारे कधीही मद्यपान न करणारांच्या तुलनेत अधिक काळ जगतात. त्यांच्यासाठी बीअर हा योग्य पर्याय असतो. कारण त्यात अल्कोहोल ठराविक प्रमाणात असते.
नैसर्गिक
बीअरमध्येही काही रासायनिक तत्वे असतात असे सांगितले जाते. पण बीअर ऑरेंज ज्यूस किंवा दुधाप्रमाणेच पूर्णपणे नैसर्गिक असते. बीअर मध्ये अल्कोहोल आणि होप्स नैसर्गिकरित्या असल्याने त्याला प्रिझर्वेटिव्हजची गरजच भासत नसते.