आरोग्यानामा ऑनलाईन टीम : दूध हा अतिशय पौष्टिक आणि सकस आहार आहे. म्हणूनच लहान मुलांना दूध पिण्यासाठी दिले जाते. दूध प्यायल्याने अनेक आरोग्यदायी लाभ होतात. परंतु, थंड दूध पिण्याचे फायदे सुद्धा भरपूर असून ते अनेकांना माहिती नसतात. थंड दुधाचा वापर करून सौंदर्यसुद्धा वाढवता येते तसेच अॅसिडिटी, स्थूलता, सारखी भूक लागणे समस्या दूर ठेवता येतात.
हे आहेत फायदे
१ चेहऱ्यावर थंड दूध लावल्याने त्वचा स्वच्छ होते. तसेच त्वचा हाडड्रेट आणि मुलायम झाल्याने सौंदर्य खुलते.
२ थंड दूधामुळे गॅस होत नाही. अन्नपचन व्यवस्थित होत असल्याने फॅट्स, तूप आणि तेल याचे चांगले पचन होते.
३ थंड दूध प्यायल्याने शरीराला ते नॉर्मल तापमानाला येण्यासाठी कॅलरीज बर्न कराव्या लागतात. नंतर त्याचे पचन होत असल्याने वजन कमी होते.
४ थंड दूधातील इलेक्ट्रोलाईट्समुळे डिहाड्रेशनपासून बचाव होतो. सकाही दूध पिणे उत्तम मानले जाते.
५ व्यायामानंतर थंड दूध प्यावे. यामुळे मसल्ससाठी आवश्यक प्रोटीन्स तसेच ऊर्जा मिळते.
६ कोमट दूध प्यायल्याने चांगली झोप लागते. पोषकघटक मिळतात.
७ अॅसिडिटी दूर होते. पेप्टिक अल्सरमुळे होणारा त्रास कमी होतो.
८ सारखी भूक लागत असल्यास थंड दूध प्यावे. यात ओट्स मिसळूनही खाता येते.
Visit : arogyanama.com