आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी कॉफी-कोकोनट फेसपॅक अत्यंत उपयोगी आहे. हा फेसपॅक चेहऱ्याची डीप क्लीनिंग करतो. त्यामुळे चेहरा तजेलदार बनतो. जाणून घ्या कॉफी कोकोनट फेसपॅक बनवण्याच्या व लावण्याच्या पद्धतीविषयी
असा तयार करा कॉफी कोकोनट फेसपॅक –
एका वाटीमध्ये २ चमचे कॉफी घ्या आणि त्यात ४ ते ५ खोबऱ्याच्या तेलाचे थेंब टाका. चांगले मिश्रण बनवा व दहा मिनिटे मिश्रण तसेच ठेवा.
फेसपॅक लावण्याची पद्धत –
हा फेस पॅक पूर्ण चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून दोनदा हा फेसपॅक लावत जा. हलक्या हाताने चेहऱ्याची मसाज करा. हा मास्क चेहऱ्यावर लावल्यावर जास्त जोरात घासू नका.
कॉफी त्वचेतील ब्लड सर्कुलेशनमध्ये मदत करते. तसेच पेशींचे पुनरुत्पादन करण्यास मदत करते. कॉफीतील काही घटक चेहऱ्याची त्वचा स्क्रब करण्याचे काम करतात. त्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्कीन दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच कॉफी त्वचा डॅमेज होण्यापासूनही वाचवते आणि सूर्याच्या घातक किरणांपासूनची त्वचेची सुरक्षा करते.
खोबऱ्याचं तेल त्वचेसाठी एक मॉइश्चरायजर म्हणून काम करतं. याच्या नियमित वापराने निर्जिव त्वचा ताजीतवाणी होऊ शकते. खोबऱ्याच्या तेलात काही असे तत्व असतात जे मायक्रोब्स आणि इतर किटाणुंपासून त्वचेची रक्षा करतात.