आरोग्यनामा ऑनलाईन – आयुर्वेदमध्ये तुळशीची पाने खूपच गुणकारी मानली जातात. तुळशीच्या पानांमध्ये न्यूट्रिएंट्स आणि अँटीऑक्सीडेंट असतात. ताप, सर्दी, खोकला आदि रोगांसाठी घरगुती उपाय म्हणून तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. तुळशीची पाने बुद्धीमत्ता वाढविण्यासाठी मदत करतात. जाणून घ्या तुळशीच्या पानांचे औषधी उपयोग-
मेंदूसाठी फायदेशीर आहे तुळशीचे पाने
तुळशीची पाने मेंदूसाठी खूपच फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने तुमची बुद्धी आणि एकाग्रता वाढते आणि भविष्यामध्ये होणाऱ्या डिमेंशिया आणि अल्जायमरची समस्या कमी होते. तुळशीचे सेवन केल्याने मेंदूची क्षमता वाढते.
तुळशीच्या पानांमध्ये अनेक पोषक तत्व
तुळशीच्या पानांमध्ये पोषक तत्व असतात. याच्या छोट्या छोट्या पानांमध्ये आपल्याला व्हीटॅमिन ए,व्हीटॅमिन सी, व्हीटॅमिन के, मॅग्नीज, फॉलेट, कॅल्शिअम आणि पोटॅशिअम मिळतात. तुळशीची पाने मेंदूसाठी खूप फायदेशीर असतात कारण हे तुमच्या रक्तामध्ये कॉर्टिकोस्टेरॉन्सची मात्रा घटविते. यामुळे आपल्या मेंदूमध्ये तणाव वाढविणारे कार्टिसोल हार्मोन्स कमी बनतात.
रोज प्या तुळशीचा चहा
तुळशीचा चहा नेहमी सर्दी ठिक होण्यासाठी पितात. तुम्ही उन्हाळ्यामध्ये देखील तुळशीच्या पानांचा चहा पिऊ शकता. हे बनविण्यासाठी एक कप गरम उकळलेले पाणी त्यामध्ये ५ ते ६ तुळशीचे पाने धुवून टाका. ५ मिनिटानंतर याला गाळून घ्या. तुम्हाला हवे तर दूधाच्या चहामध्ये ही ५ ते ६ तुळशीचे पाने टाकून पिऊ शकता. याचा तुम्हाला खूप फायदा होईल.
सॅलडमध्ये तुळशीचे पाने
गर्मीमध्ये सॅलड खाणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर असते. या वातावरणामध्ये तुम्ही रोज खाण्यामध्ये सॅलडच्या रुपामध्ये काकडी, कांदा, लिंबू आणि गाजर सामील करु शकता. तुळशीच्या पाने रक्त फिल्टर करण्याचे काम करते.