आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मसाल्यातील महत्वाचा पदार्थ म्हणून हिंग ओळखला जातो. हिंगाचा एवढाच उपयोग नसून तो एक औषधी पदार्थ सुद्धा आहे. दररोज चिमूटभर हिंग वापराल तर अनेक आजारांपासून मुक्ती मिळू शकेल. जाणून घ्या रोज हिंगाचे सेवन केल्याने शरीराला होणारे फायदे –
रक्तदाबावर नियंत्रण
हिंग ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. हिंगात रक्त पातळ करण्याचे गुण असतात. ज्याने ब्लड प्रेशर अनियंत्रित होण्यापासून मुक्ती मिळते.
डोकेदुखी
रोज हिंगाचे सेवन केल्याने डोकेदुखीपासून मुक्ती मिळू शकते. डोकेदुखीचे प्रमाण अधिक असल्यास एका ग्लासात 2 चिमूट हिंग उकळून घ्या. कोमट झाल्यावर दिवसातून दोनदा प्यावे.
श्वसनाचे आजार
श्वासासंबंधी आजार असल्यास हिंगात जरासं पाणी मिसळून छातीला लावल्याने आराम मिळतो.
खोकला आणि दमा
खोकल्याची समस्या असल्यास हिंगाचे सेवन फायदेशीर आहे. खोकला आणि दमा यांसारख्या आजारात हिंगात मध मिसळून सेवन केल्याने फरक पडतो.
दातदुखी
दात दुखत असल्यास हिंग पाण्यात उकळून त्याने गुळण्या कराव्यात. याने दातदुखी कमी होते.
पीरियड्सच्या वेदनांपासून मुक्ती
पीरियड्स दरम्यान वेदनापासून मुक्तीसाठी एक ग्लास ताकात २ चिमूट काळं मीठ आणि १ चिमूट हिंग मिसळून प्यावं. हिंग प्रोजेस्ट्रॉन हार्मोन्स उत्पादनात मदत करतं, ज्याने ब्लड फ्लो सुरळीत राहतं.