आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आवळा हे फळ आणि त्याची पाने औषधी आहेत. आवळ्याचा मुरब्बा गुणकारी असून शरीरासाठी लाभदायक आहे. आवळ्यामधील औषधी गुणांना विज्ञानानेही मान्य केले आहे. आवळ्याचा उपयोग करून विविध आजारांवर उपचार करता येतात. आवळ्याचे औषधी गुण आणि उपायांची खास माहिती आपण जाणून घेणार आहोत.
* तोंड आले असेल तर आवळ्याच्या झाडाची पाने चघळावीत. लवकर आराम मिळतो. जेवताना दातांमध्ये जीभ आल्यामुळे जिभेतुन रक्त आल्यास लगेच आवळ्याची पाने चावून चघळावीत.
* आवळ्याचा ५० मिली रस तयार करून यामध्ये गायीचे ५ ग्रॅम शुद्ध तूप मिसळावे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी या मिश्रणाचे सेवन केल्यास विर्यामध्ये शुक्राणू कमतरतेची समस्या दूर होते. महिनाभर हा उपाय केल्यास फरक जाणवेल.
* आवळा, पिंपळाची साल आणि चित्रक झाडाची पाने प्रत्येकी ६ ग्रॅम घेऊन ४० मिली पाण्यात उकळून काढा तयार करावा. ताप आलेल्या रुग्णाला दिवसातून चार-पाच तासांच्या अंतराने हा काढा दिल्यास ताप लवकर उतरेल.
* कच्च्या आवळ्याच्या एक ग्लास रसामध्ये २ ग्रॅम हळद टाकून दररोज हा रस घेणे स्फूर्तीदायक आहे. मधुमेह नियंत्रणासाठी हा अत्यंत फायदेशीर उपाय आहे.
* रक्तदाब, हृदयाचे ठोके वाढणे, मानसिक तणाव, अनिद्रा यांसारख्या व्याधींमध्ये २० ग्रॅम गाजराच्या रसात ४० ग्रॅम आवळ्याचा रस मिसळून सेवन करावा.
* सर्दी किंवा कफाचा त्रास असेल तर आवळ्याच्या १०-२० मि.ली. रसात १ ग्रॅम चूर्णात पाव चमचा हळद टाकून घ्यावे.
* १० ते १५ मि.ली. आवळ्याचा रस, १० ते १५ ग्रॅम मध, १० ते १५ ग्रॅम खडीसाखर, २० ग्रॅम तूप मिसळून त्याचे चाटण घेतल्यास वृद्धावस्था दूरच राहते.
* १५ ते २० मि.ली. आवळ्याचा रस तसेच एक चमचा मध मिसळून त्याचे चाटण घेतल्यास दृष्टी तीक्ष्ण होते.
* आवळ्याचे चूर्ण आणि अश्वगंधाचे समान प्रमाणात दिवसातून दोन वेळेस सेवन करणे चांगल्या आरोग्यासाठी एखाद्या टॉनिकप्रमाणे मानले जाते. पौरुषत्वासाठी हा एक उत्तम उपाय आहे.
* आवळ्याच्या सेवनाने मेंदू पुष्ट, श्वासरोग दूर आणि हृदय मजबूत होते. नेत्रदृष्टी व आतड्याची कार्यशक्ती वाढते. यकृत निरोगी होऊन पचनशक्ती वाढते. आवळा रक्तशुद्धीकरण व रक्ताभिसरणातही गुणकारी असून विर्याचा स्रोत आहे.
* आवळ्याचे सुकलेले फळ आणि पाने प्रत्येकी ४ ग्रॅम घेऊन बारीक कुटून घ्या. या मिश्रणात थोडीशी हळद मिसळून दररोज दिवसातून कमीतकमी दोन वेळेस जेवणानंतर हे चूर्ण घेतल्यास मधुमेह नियंत्रणात येईल.
* पिवळे दात पांढरेशुभ्र करण्यासाठी दातांवर आवळ्याच्या रसाची मालिश करावी.
* २५० ग्रॅम आवळा चूर्णात ५० ग्रॅम वाटलेल्या लसणाची पेस्ट मिसळून हे मिश्रण मधात मिसळून १५ दिवस उन्हात ठेवावे. त्यानंतर दररोज एक चमचा मिश्रण खावे. यामुळे हृदरोग होत नाहीत.
* शारीरिक ताकद आणि मजबुतीसाठी आवळा उत्तम फळ मानले जाते. आवळ्याच्या चूर्णासोबत गुळवेल चूर्ण घेतल्यास शरीरात उर्जेचा संचार होतो.
* मधासोबत आवळ्याचे चूर्ण खाल्ल्यास शारीरक आणि मानसिक ताकद वाढते. २० दिवस दररोज सकाळी रिकाम्या पोटी तिळासोबत आवळा खाल्ल्यास शरीर तंदुरुस्त होते.
* दोन चमचे आवळ्याचा रस आणि दोन चमचे कच्च्या हळदीचा रस मधासोबत घेतल्याने प्रमेह दूर होतो. काही दिवस हा प्रयोग केल्याने मधुमेह नियंत्रणात येतो तसेच सर्व प्रकारच्या मुत्रसंबंधी व्याधींपासून सुटका होते.
* सुकेलेल आवळे तसेच धने समप्रमाणात घेऊन रात्री मातीच्या भांड्यात भिजत ठेवावे. सकाळी ते पाणी गाळून त्यात खडीसाखर मिसळून प्यावे. यामुळे लघवीची जळजळ थांबते तसेच मुत्ररोगांमध्ये लाभ होतो.
* आवळ्याचा मुरंबा खाल्याने पोट साफ राहते. शरीरातील सुस्ती व अशक्तपणा दूर होतो. मधुमेहाच्या रुग्णांनी नियमित मुरंबा खावा.