आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सकाळी भिजलेले बदाम अनेकजण खातात. तसेच बदामाचे नियमित सेवन केल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. आठवड्यातून पाच वेळा बदामाचे सेवन केल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ५० टक्क्यांपर्यंत कमी होतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. बदाम कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रित ठेवतात. तसेच त्यांच्या आवरणात असलेले फ्लेव्हनॉइड्स विविध रोगांपासून हृदयाचे संरक्षण करतात.
जेवणानंतर रक्तात वाढणारी साखरेची पातळी कमी करण्याची ताकद बदामात आहे. यामध्ये ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेशी संबंधित आजारांमध्ये फायदा मिळतो. रात्री पाण्यात भिजवून ठेवलेले बदाम सकाळी सेवन करणे खूप फायदेशीर ठरते. भिजलेल्या बदामातून निघणारे एंझाइम त्यातील फॅट पचवण्यास मदत करते. बदामात १३ टक्के प्रथिने, २५ टक्के कॅल्शियम, २० टक्के लोह असते. हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवल्यास ४ वर्षांपर्यंत बदाम सुरक्षित राहतात.
बदामातील फॉस्फरसमुळे हाडे आणि दात बळकट होतात. हाडे आणि दातांशी संबंधित आजार होण्याचा धोकासुद्धा कमी होतो. दातांसाठी आवश्यक असणारे फॉस्फरस बदामातून पुरेशा प्रमाणात मिळते. आठवड्यातून दोन वेळा बदाम खाल्ल्यास सडपातळपणा येतो. बदामात असलेल्या डायटरी फायबरमुळे वजन वाढण्यास प्रतिबंध होतो.