आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Benefits of Ajwain | ओवा दिसायला खुप लहान आहेत, पण त्याचे फायदे खूप आश्चर्यकारक आहेत. प्रत्येक किचनमध्ये आढळणारी ही वस्तू आरोग्य सशक्त ठेवण्यासाठी खूप उपयोगी आहे. यात फायबर (Fiber), अँटिऑक्सिडेंट्स (Antioxidants), खनिजे (Minerals) आणि जीवनसत्त्वे (Vitamins) भरपूर प्रमाणात असतात. हे औषधी गुणधर्मांनी (Medicinal Properties) युक्त असे आहे. त्याची चव कडू आणि थोडी तिखट असते. ओवांमध्ये असलेल्या पोषक तत्त्वांमुळे त्या आरोग्यासाठी खूप चांगलं मानल्या जातात. याचे फायदे पुढीलप्रमाणे (Benefits of Ajwain)…
पोटात जळजळ होणे (Inflammation In Stomach) –
पोटात जळजळ होत असेल तर ओवा खाणे खुप फायदेशिर ठरते. यात अँटीस्पास्मोडिक गुणधर्म (Antispasmodic Properties) आहेत. त्यामुळे त्याच्या सेवनाने अपचनामुळे होणार्या त्रासापासून मुक्ती मिळते. ओवा भाजूनही खाऊ शकतात. पाणी किंवा ब्लॅक टीसोबत याचे सेवन खूप फायद्याचे (Benefits of Ajwain) मानले जाते.
वजन कमी करण्यासाठी (Lose Weight) दररोज ओवा खाणे फायद्याचे आहे. ओवांमध्ये थोड्या प्रमाणात फायबर आढळते. त्याचा उपयोग पाचनक्रिया (Digestion) सुधारण्यासाठी होतो.
सर्दीपासून आराम (Relief From Cold) –
ओवा रोज खाल्ल्यामुळे अनेक आरोग्य समस्यांमध्ये आराम मिळतो. थंडीत सर्दी खोकल्याची समस्या सामान्य आहे. पण ओवांमध्ये थोडं आले (Ginger) आणि गूळ (Jaggery) घालून खा. यामुळे घशात जमा झालेला कफ दूर होईल आणि सर्दीपासून आराम मिळेल.
त्वचेला फायदा (Beneficial For Skin) –
ओवा त्वचेसाठीही खूप चांगल्या मानल्या जातात. यात अँटीफिमेलिटी, अँटीबिट्रल असे गुणधर्म आहेत. जे त्वचेच्या छिद्रांसाठी चांगले असतात.
कान आणि दातदुखी बरी होते (Beneficial For Earache And Toothache) –
कानातील वेदना दूर करण्यासाठी, ओव्याच्या तेलाचे (Carom Seeds Oil) दोन थेंब कानात टाका.
दातदुखीसाठी कोमट पाण्यात मीठ आणि ओवा घालून गुळण्या कराव्यात. यामुळे दातांचे दुखणे दूर होईल.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Benefits of Ajwain | benefits of carom seeds