आरोग्यनामा ऑनलाईन टीम – फळांचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देत असतात. कारण फळांमध्ये अनेक पोषकतत्व तसेच औषधी गुणधर्म असतात. यामुळे अनेक आजारांवर मात करणे सहज शक्य होऊ शकते. शिवाय नियमित फळांचे सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते. कोणत्या रोगापासून बचाव करण्यासाठी कोणते फळ सेवन करावे, याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
ही फळे नियमित खा
1 हिरवे सफरचंद
हे मधुमेह नियंत्रित करण्यासाठी, फुफ्फुसाच्या कॅन्सरची शक्यता 21 टक्के कमी करणे, वाढत्या वयाचा प्रभाव रोखणे, रक्त शुद्ध करणे, हाडांना मजबूत करणे आणि मेटाबोलिज्म वाढण्यासाठी उपयोगी आहे.
2 सीताफळ
यात वजन वाढवण्याची क्षमता भरपूर असते. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याची क्षमता असते. भरपूर उर्जा मिळते. थकवा दूर होतो. मांसपेशींच्या समस्येपासून सुटका होते.
3 द्राक्षे
मधुमेहाच्या रूग्णांसाठी खुप फायदेशीर आहे. मायग्रेनचा त्रास असलेल्यांनी द्राक्षाचा रस घेतल्यास फायदा होतो.
4 पेर
बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते.
5 पेरू
याची पाने रक्तातील शुगर कमी करतात. शुगर लेव्हल नियंत्रित राहते. मधुमेहाच्या रुग्णांनी पेरूच्या पानांचे चूर्ण खावे.