आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पोट फुगणे या समस्येला वैद्यकीय भाषेत टमी ब्लोटिंग म्हटले जाते. पोटात सतत गॅस आणि अॅसिड गेल्याने पोट फुगते. चुकीचे खाणे-पिणे आणि वेळीअवेळी खाण्याने ही समस्या होते. या समस्येवर बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत. परंतु, सतत अशी औषधे घेतल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. यावर काही खास घरगुती उपाय असून ते जाणून घेवूयात.
हे उपाय करा
1 आहारात लसणाचा समावेश करा. हळूहळू आहारातील लसणाचे प्रमाण वाढवा. यामुळे पचनक्रिया चांगली होते. आतड्यांमध्ये फसलेले बॅक्टेरिया बाहेर येतात.
2 केळ्याचे सेवन करा. यामुळे पोटातील गॅसची समस्या दूर होते. पोट फुगण्याची समस्याही दूर होते.
3 चहा करताना त्यामध्ये पुदिन्याची 2 ते 3 पाने टाका. या चहाने आराम मिळेल.
4 शंभर ग्रॅम बडीशेप लिंबाच्या रसात मिसळून एका बाटलीत ठेवा. ही बडीशेप जेवण केल्यानंतर थोडी खावी.
5 गरमीच्या दिवसात दही खाल्याने गॅसची समस्याही होत नाही.
6 चहामधून किंवा एखाद्या पदार्थामधून आले सेवन करा. 2 ते 3 दिवस हे खाल्यास पोट फुगण्याची समस्या दूर होईल.
7 लिंबू पाणी प्या. यामुळे पोटात गॅस तयार होणार नाही.