आरोग्यानामा ऑनलाइन टीम – बीटमधील अँटीऑक्सिडेंटमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यात सोडियम, पोटॅशियम, फॉस्फोरस, क्लोरिन, आयोडीन आणि अन्य महत्त्वाची जीवनसत्वे असतात. बीटचे ज्युस प्यायल्याने हिमोग्लोबिन वाढते. बिटमधील नायट्रेट नावाच्या रसायनामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच हृदयरोगाचा धोका कमी होतो.
हे आहेत उपाय
१ वजन कमी करण्याचा बीट उत्तम उपाय आहे, कच्चे बीट किंवा कमीतकमी २ बीटचे ज्यूस दररोज उपाशी पोटी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
२ काही आदिवासी कॅन्सरसारख्या भयावह आजाराने ग्रस्त रुग्णांना बीट खाण्याचा सल्ला देतात. आधुनिक संशोधनामध्येही कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी बीट महत्वपूर्ण असल्याचे सांगण्यात आले आहे.
३ यामुळे पचनक्रिया चांगली होते. रात्री झोपण्यापूर्वी एक किंवा अर्धा ग्लास बिटचे ज्यूस घेणे लाभदायक आहे. एनर्जी मिळते आणि थकवा दूर होतो. हाय बीपी नॉर्मल होते.
४ बीटमध्ये उच्च प्रमाणात फॉलिक अॅसिड असते. हे गर्भवती महीला आणि बाळासाठी लाभदायक आहे. गर्भवती महीलांना यामुळे अतिरिक्त उर्जा मिळते.
५ बीट ज्युसमध्ये आढळणारा नाईट्रेट ब्लड प्रेशर कमी करतो. हाय ब्लड प्रेशरमध्ये बीट ज्युस वरदान आहे.
६ आळस, थकवा जाणवत असेल तर बिटचे सेवन करा. कार्बोहायड्रेटमुळे एनर्जी वाढते.
७ किडनी आणि पित्ताशय विकारांमध्ये बीट ज्युस आणि गाजर ज्युस एकत्रित करून पिणे आरोग्यदायी असते.