आरोग्यनामा ऑनलाईन टीम – हळदीत असलेल्या करक्यूमिन सारख्या अँटीऑक्सीडेंट्स मुळे त्वचेच्या सौंदर्याच्या संबंधीत अनेक समस्या दूर होऊ शकतात. यातील अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज ब्यूटी वाढवण्यात मदत करतात. रोज हळदीचा वापर करून त्वचेची काळजी घेतल्यास त्वचा सुंदर होते. हळद मधा मध्ये मिसळून लावणे जास्त गुणकारी असते. हळ्दी मध्ये मध मिसळल्याने त्वचेचा ओलावा टिकून राहतो. यामुळे स्किन टाइट होते. त्वचेचा ग्लो वाढविण्यासाठी हळद आणि अन्य पदार्थांचा वापर कसा करावा, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा मध मिसळा. हे पाण्यात मिक्स करुन घ्यावे. हे पाणी आइस टे मध्ये टाकून फ्रीजरमध्ये ठेवा. दोन तासांनंतर याचे आइस क्यूब तयार होतील. हे क्यूब्स हलक्या हातांनी चेहऱ्यावर दोन मिनिटे हलकेच रगडावे. हे क्यूब चेहऱ्यावर हलक्या हाताने रगडल्यास चेह-याचा ग्लो वाढतो. स्किन सॉफ्ट होते. त्वचेच्या डेड सेल्स निघून जातात. रंग गोरा होतो. तसेच स्किन टाइट होते. रिंकल्स ठिक होतात. यामुळे पिंपल्स ठिक होतात. चेहऱ्याचे डाग दूर होतात. शिवाय, सुरकूत्या ठिक होतात.