आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उकळलेल्या तांदूळाची पाणी आरोग्यासाठी खूप लाभदायक असते. शिवाय हे त्वचेसाठी सुद्धा गुणकारी आहे. तांदूळामुळे त्वचेचे चांगले पोषण होते. त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी घरगुती उपाय म्हणून तांदळाच्या पाण्याचा उपयोग केला जातो. हा उपाय खुप फायदेशीर असून आठवड्यातून एक वेळा तरी करावा.
ओलावा टिकतो
या पाण्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन आणि अँटी-ऑक्सीडेंट असल्याने त्वचेचा ओलावा टिकून राहतो. हे लावल्याने चेहरा उजळतो. डाग आणि सुरकूत्या दूर होतात. त्वचेच्या पोर्स टाइट होतात. हे पाणी क्लींजरचे कामदेखील करते.
असा करा उपाय
१ एक कप तांदूळ चांगल्या प्रकारे स्वच्छ करुन पाण्यात भिजवा.
२ अध्र्या तासानंतर भांडे गॅसवर ठेवा आणि तांदूळ शीजू द्या.
३ तांदूळ शिजल्यानंतर त्याचे पाणी काढा आणि गार होऊ द्या.
४ हे पाणी हलक्या हाताने मसाज करून लावा.
५ मसाज केल्याच्या १० मिनीटानंतर तांदळाच्या पाण्यानेच चेहरा धुवा. आणि पुसून घ्या.
६ त्वचेत तात्काळ फरक दिसून येतो