आरोग्यनामा ऑनलाइन टीम – खजूरमध्ये आरोग्यासह सुंदरता वाढवणारे अनेक पोषक घटक असतात. रोज पाच खजूर खाल्ल्यास खूप चांगला परिणाम शरीरावर दिसून येतो. काही विशेष पध्दतींनी खजूर खाल्ल्यास त्याची गोडी आणखी वाढू शकते. खजूर फ्रूट सलाडमध्ये, दह्यासोबत, दूधामध्ये मिसळून किंवा सुकामेव्यासह खाता येतात. येथे आपण खजूर खाण्याचे 6 फायदे जाणून घेणार आहोत.
हे फायदे होतात
१ आयर्नमुळे रक्ताभिसरण चांगले होते.
२ यातील व्हिटॅमीन बी मुळे तारूण्यपिटीका जातात.
३ मृत त्वचा निघून जाते. चमक वाढते.
४ शरीरातील टॉक्सीन्स दूर होतात. त्वचेचा ग्लो वाढतो.
५ यातील व्हिटॅमीन सी मुळे स्कीन टाइट होते. रिंकल्सपासून बचाव होतो.
६ केस काळे आणि दाट होतात.