आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गहू हे रोजच्या आहारातील एक खाद्य आहे. आपण आपल्या जेवणामध्ये गव्हाचा रोज वापर करतो. लहान मुलांना तर भाकरी ही नकोच असते. त्यांना २ वेळेच्या जेवणात गव्हाची पोळी लागते. पण गहू हा आपल्या आरोग्यासाठी खूप घातक आहे.
गव्हाचे आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम खालीलप्रमाणे:
१) मानसिक ताणामुळे रक्तातील कोलेस्टोरॉलची पातळी वाढते. गव्हाच्या सेवनाने त्याला अधिक हातभार लागतो. याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
२) गव्हात स्निग्धतेचा अंश मोठा आहे. गहू आतड्याला चिकटून बसतो. व त्यामुळे तो बर्याच रोगांना आमंत्रण मिळते.
३) गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते. खरं तर स्निकर्सच्या एका बार मुळे रक्तातली साखर जेवढी वाढेल, त्यापेक्षा जास्त गव्हाच्या ब्रेडच्या दोन स्लाईसेस मुळे वाढते.
४) गव्हामुळे रक्तातील साखर वाढते त्यामुळे मधुमेहाचा धोका निर्माण होतो.
५) गव्हाचा आहारात उपयोग केल्याने वजन वाढते. त्यामुळे गहू हा आरोग्यास घातक आहे.