आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Chilad Anemia | शरीरात रक्ताची कमतरता होणे म्हणजे अॅनिमिया होय. या आजारामुळे खुप अशक्तपणा जाणवतो. शरीरातील लोह कमी झाल्याने अॅनिमिया होतो. लहानमुलांना कावीळसोबत हा आजार होऊ शकतो (Chilad Anemia). यामुळे बाळाचे शरीर पिवळे दिसते, वेगाने श्वास घ्यावा लागतो. अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे गेले पाहिजे.
ही आहेत लक्षणे
१) निळे व बारीक डोळे
२) शौचातून रक्त येणे
३) कमकुवत नखे
४) भूक मंदावणे
५) थकवा
६) डोकेदुखी
७) पिवळी त्वचा
८) श्वास घेण्यास त्रास
अशी घ्या काळजी
– वरील लक्षणे आढल्यास बाळाला रोज कोमट पाण्यात मध टाकून पाजा. यामुळे रक्ताच्या पेशी वाढतात.
– एक ते पाच वर्षांच्या बाळाला अॅनेमिया झाल्यास फोलेट व आयर्न वाढवणारे औषध दिले जाते. ते डॉक्टरांच्या सल्ल्याने त्वरित घ्यावे.
– लहान बाळाला पाच वर्षापर्यंत गायीचे दूध देणे टाळावे. गायीच्या दुधामुळे अॅनिमिया होण्याची शक्यता वाढते.
Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या
Monkeypox in US | कोरोनादरम्यान नवीन संकट ! अमेरिकेच्या टेक्सासमध्ये आढळली दुर्मिळ ‘मंकीपोक्स’ची केस