आरोग्यनामा ऑनलाईन टीम – लेप्टोस्पायरोसिस हा आजार बॅक्टरीयांमुळे होत असून पावसाळ्यात त्याचे संक्रमण अधिक प्रमाणात होते. संक्रमित पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्यामार्फत हा आजार पसरतो.
दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यामुळेही हा आजार उद्भवतो. साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर शरीरातील जखमा, ओरखड्यांच्या माध्यमातून हे बॅक्टेरिया शरीरात जातात. वेळीच उपचार केल्यास या आजारावर मात करता येऊ शकते. अन्यथा हा आजार जीवघेणा ठरू शकतो.
लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे:
डोकेदुखी,
उलट्या,
स्नायूंचे दुखणे,
थंडी वाजणे
त्वचेवर रॅश येणे
लेप्टोस्पायरोसिस होऊ नये म्हणून ‘ही’ काळजी घ्या
मीठ, साखर आणि पाण्याचे मिश्रण प्या.
आहारात सूप, डाळ यांच्यामध्ये आल्याचा वापर करा.
उंदीर-घुशींचा नायनाट करावा.
पावसाळ्याच्या दिवसात घाणीचं साम्राज्य पसरू नये यासाठी स्वच्छता ठेवा. कच-याची त्वरित विल्हेवाट लावावी.