आरोग्यनामा ऑनलाईन- तुम्हाला माहित आहे का? नाकातील केस तोडण्याची सवय जीवघेणी ठरू शकते. नकळतपणे या सवयीमुळे जिवसुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे सावधानता बाळगावी.
नाकात केस 2 प्रकारचे असतात, यापैकी काही केस लहान आणि काही जाड असतात. लांब नाकाच्या केसांना व्हिब्रिस असे म्हणतात. नाकाचे केस हे शरीराच्या संरक्षण प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण, जेव्हा श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साईड तसेच बॅक्टेरिया, धूळ आणि घाण देखील शरीरात प्रवेश करते. त्यावेळी नाकातील केस धूळ, घाणीला नाकात जाण्यापासून रोखत असतात.
फायदेशीर असतात नाकातील केस
नाकात जर केस नसतील तर श्वास घेताना धूळ, माती, बॅक्टेरिया शरीरामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे आजारांशी सामना करावा लागू शकतो. नाकातील केस फुफ्फुसांच्या फिल्टरसाठी कार्य करतात.
नाकामध्ये रक्तवाहिन्या असतात. त्या थेट मेंदूजवळ असलेल्या रक्तवाहिन्यांशी जोडलेल्या असतात. म्हणून, धक्क्याने नाकाचे केस तोडल्यामुळे रक्तवाहिन्यांत छिद्र तयार होते आणि रक्त बाहेर येऊ लागते. यामुळे गंभीर संसर्ग होतो, जो मेंदूच्या मज्जातंतूपर्यंत पोहोचू शकतो आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो.
नाकाचे केस कापायचे असल्यास लहान कात्रीने कापून घ्यावीत. किंवा आपण नाक हेअर ट्रिमर वापरू शकता.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.