आरोग्यनामा ऑनलाईन – रस्त्यावर मिळणारे खाद्यपदार्थ हे खाण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, हे पदार्थ बनविताना आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. या पदार्थांचा आरोग्य आणि अन्नाद्वारे पसरणाऱ्या रोगांशी जवळचा संबंध आहे. तळलेल्या खाद्यपदार्थातील कॅलरीची उच्च मात्रा हृदयासाठी तसेच आरोग्यासाठी घातक आहे. रस्त्यावरील खाद्य पदार्थांचेसेवन केल्याने होणारे आजार ही भारतात एक गंभीर समस्या आहे.
रस्त्यावरील अन्न पदाथत्र्तंची अयोग्य पद्धतीने हाताळणी, निकृष्ट दर्जा यामुळे यामळे हीपेटायटीस अ व्हायरस पसरू शकतो. दूषित पाणी, अर्धवट शिजवलेला शेलफिश हे या व्हायरसचे प्रमुख स्रोत आहेत. त्याचे निदान करण्यासाठी रक्त तपासणी करावी लागते कारण त्याची लक्षणे इतर रोगांसारखीच असतात. अ, इ, उ, ऊ आणि ए या ५ ज्ञात हीपेटायटिस व्हायरसपैकी हा एक आहे. वारंवार बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यात आले तर अशाप्रकारचे आजार होण्याची शक्यता अधिक बळावते. फास्ट फुडमध्ये सोडीयम, सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असल्याने असे पदार्थ सतत खाण्यात आल्यास उच्च रक्तदाब, हृदय विकार आणि जाडेपणा असे आजार होतात. खराब कोलेस्टेरॉल वाढण्याची आणि चांगले कोलेस्टेरॉल कमी होण्याची शक्यता असते.
एखादी व्यक्ती बाहेरचे अन्न खात असेल, तर त्याचा शरीरावर हानिकारक परिणाम टाळण्यासाठी काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. रस्त्यावरील खाद्य पदार्थांशी निगडीत अस्वच्छता, असुरक्षित पाण्याचा वापर, रस्त्यावरील प्रदूषणाचा परिणाम ह्या काही अशा गोष्टी आहेत, ज्या तुमच्या खाण्याच्या प्लेटमध्ये बॅक्टेरियांची संख्या वाढत असते. खाद्य पदार्थ अधिक काळ टिकावेत आणि त्यातील स्वाद वाढावा यासाठी रस्त्यावर मिळर्णाया चिकन लॉलीपॉप, फ्रेंच फ्राइज, फ्रँकी अशा विविध खाद्य पदार्थांत खूप जास्त मीठ घातलेले असते. ज्या व्यक्तिला शरीरात पाणी साठण्याचा त्रास असतो तसेच उच्च रक्तदबाची समस्या असते त्याच्यासाठी हे पदार्थ हानिकारक ठरतात.
रस्त्यावर मिळणारे पदार्थ मोठ्या आचेवर तळले जातात. तेलाचा पुन्हा पुन्हा तळण्यासाठी केला जातो. ते त्याचा स्मोक-पॉइंट पार करते. ज्याच्यामुळे मुक्त रॅडीकल्स मोठ्या संख्येत सुटी होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांसाठी ती कॅन्सर निर्माण करणारी ठरतात. तेलाचा पुन्हा पुन्हा अनेकवेळा वापर केल्याने तेलात ट्रान्स-फॅट वाढते. रस्त्यावरील खाद्यपदार्थांत मैदा आणि साखर हे मुख्य घटक असतात. त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स उच्च असल्याने या पदार्थांच्या अधिक सेवनाने अनियंत्रित मधुमेह, स्थूलता, कॅन्सर व इतर रोग होऊ शकतात.