आरोग्यनामा ऑनलाईन टीम – थॅलॅसिमिया रक्ताशी संबंधित असलेला हा अनुवंशिक आजार आहे. हा आजार रक्तद्रव्यातल्या एका जनुकीय दोषांमुळे होतो. यात हिमोग्लोबिन तयार होण्याचे प्रमाण खूपच संथ होते. थॅलॅसिमियाग्रस्त मूल जन्मल्यानंतर दोन महिन्यांतच अगदी आजारी दिसते. त्याच्या शरीरात रक्तद्रव्य कमी असते. यामुळे बाळाची वाढ होत नाही. या आजाराचे निदान रक्त तपासणीनेच होऊ शकते.
थॅलॅसिमियाचे प्रकार –
मेजर
मिडियम
मायनर
थॅलॅसिमियाची लक्षणे –
अॅनिमिया
हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होत जाणे
हाडे ठिसूळ होणे
कपाळाचे हाड पुढे येते
नाक चपटे होते
थॅलॅसिमिया हा आजार बरा होत नाही. या आजारावर उपचार म्हणजे शरीरात वारंवार रक्त भरण्याची गरज लागते. याचबरोबर आणखी काही औषधे द्यावी लागतात. निदान झाल्यानंतर रक्त घेण्यास सुरुवात न केल्यास मृत्यूही येऊ शकतो.