आरोग्यनामा ऑनलाईन टीम – हल्ली टॅटू काढणं फॅशन बनली आहे. टॅटूची लोकप्रियता वाढत आहे. मात्र टॅटू काढणं ही वाटतं तेवढी साधी गोष्ट नव्हे. टॅटू ही ‘मिनी सर्जिकल प्रोसिजर’ आहे. त्यात काही धोकेही असू शकतात. जाणून घ्या टॅटूमुळे होऊ शकते हे नुकसान –
1) टॅटू काढून घेणाऱ्याची त्वचा संवेदनशील असेल तर त्वचेवर ॲलर्जी येऊ शकते.
2) टॅटूसाठी वापरलेल्या सुयांचा एकाहून अधिक ग्राहकांसाठी वापर होत असेल तर त्यामार्फत एचआयव्ही, हिपॅटायटिस ‘बी’, हिपॅटायटिस ‘सी’ अशा आजारांचं संक्रमण होण्याची शक्यता असते.
3) शरीरावर जिथे टॅटू करायचा तिथं एखादी महत्त्वाची शिर किंवा रक्तवाहिनी असेल तर इजा होऊ शकते.
4) टॅटूमुळे रक्तवाहिनीतून संसर्ग होऊन त्या भागाला गँगरीन होण्याचाही धोका असतो.
5) टॅटू अधिक आकर्षक दिसण्यासाठी टॅटूवर पिअर्सिंग केलं जात आहे. पिअर्सिंगमुळे त्वचेला इन्फेक्शन होण्याचं प्रमाण वाढत आहे.
6) टॅटू काढून झाल्यानंतर त्यावरील प्लास्टिक कव्हर अर्थात क्लिगं रॅप लगेचच काढू नका.
7) गळ्याभोवती, नाभी आणि मनगटावर टॅटू काढून त्यावर पिअर्सिंग केलं जातं, ते अतिशय धोकादायक आहे . गळा, नाभी आणि मनगटावरची त्वचा खूप नाजूक असते.
8) पिअर्सिंग करुन लावलेली रिंग निघाल्यास गंभीर जखम होण्याचीही शक्यता असते.
9) टॅटू किंवा पिअर्सिंग एखाद्या शिरेवर आल्यास ते जीवघेणं ठरु शकतं.