आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Bathroom Stroke | बाथरूम स्ट्रोकला ब्रेन स्ट्रोक सुद्धा म्हणतात आणि हिवाळ्यात बाथरूम स्ट्रोकचा धोका अधिकच वाढतो. परंतु अनेक वेळा असे घडते की, या समस्येचा बळी असूनही असे का घडले हे लोकांना समजत नाही. अनेक लोक बाथरूम स्ट्रोकच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. हे तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला बाथरूम स्त्रोक (Bathroom Stroke) आणि त्याच्या लक्षणांची माहित असणे आवश्यक आहे.
तुम्हाला माहित आहे का ब्रेन स्ट्रोक ही समस्या अधिकतर आंघोळीच्या वेळी का उद्भवते? जर माहीत नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे.
बाथरूम स्ट्रोक म्हणजे काय?
थंडीच्या दिवसांमध्ये जेव्हा कोणी थंड पाण्याने अंघोळ करतो आणि थंड पाणी थेट डोक्यावर टाकतो. त्यामुळे मेंदूतील तापमान नियंत्रित करणारे एड्रेनालाईन हार्मोन (Adrenaline Hormone) वेगाने बाहेर पडतात. त्यामुळे रक्तदाब अचानक वाढतो आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. यासोबतच तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम, लठ्ठपणा (Obesity), डायबिटीज (Diebetes) आणि हाय बीपी सारख्या समस्या असतील तर तुम्हाला हा त्रास होऊ शकतो.
ब्रेन स्ट्रोकची लक्षणे :
शरीराच्या एका भागात कमजोरी, बेशुद्ध होणे, हात-पाय सुन्न होणे,चेहरा वाकडा होणे, समजण्यात आणि बोलण्यात समस्या ही काही मुख्य लक्षणे. यासोबतच ब्रेन स्ट्रोकच्या वेळी अर्धांगवायूची (Hemiplegia) समस्याही उद्भवू शकते. आंघोळ करताना तुम्हाला असे काही वाटत असेल तर तुम्ही नक्की तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
आंघोळ करताना कोणती खबरदारी घ्यावी
– आंघोळ करताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. ज्यानेकरून ब्रेन स्ट्रोकचा धोका टाळता येईल.
-हिवाळ्यात अंघोळीसाठी कधीही थंड पाण्याचा वापर करू नये.
जर तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ करायला आवडत नसेल तर तुम्ही कोमट पाणी वापरा.
-अंघोळ करताना आधी डोक्यावर कधीही पाणी टाकू नये. प्रथम पायांवर पाणी टाका, त्यानंतर गुडघ्यावर, पोटावर आणि शरीराच्या इतर अवयवांवर थोडे-थोडे पाणी टाका, शेवटी डोक्यावर पाणी घाला.
-जर तुम्ही शॉवर वापरत असाल. तरी आपण प्रथम डोक्याऐवजी आपल्या शरीराच्या इतर भागावर पाणी वापरावे.
याच्या मदतीने तुम्ही ब्रेन स्ट्रोकची समस्या बर्याच प्रमाणात टाळू शकता.
ह्या काही छोट्या छोट्या खबरदारी घेऊन आपण स्वतःला बाथरूम स्रोक (Bathroom Stroke) पासून वाचवू शकतो.
Web Title :- Bathroom Stroke | know what is bathroom stroke and its causes and precautions
Benifits of Ginger | 30 दिवसांपर्यंत आल्याचं सेवन केल्यास हे आजार दूर होतात, जाणून घ्या