पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – सध्या वाढते वजन ही एक खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच पोटावरची चरबी वाढल्याने तर अनेकजण हैराण झाले आहेत. अनेकजण तर पोटावरची चरबी कशी कमी करायची याच्यासाठी प्रयत्न करत असतात. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी पायलेट्स एक्सरसाइज उत्तम आहे. याने पोटावरची चरबी खूप लवकर कमी होते. आणि सध्या दीपिका पदुकोण, करीन कपूर या पायलेट्स एक्सरसाइज करतानाचे व्हिडीओ शेअर करत आहेत. त्यामुळे ही एक्सरसाइज करण्याचा ट्रेन्ड सध्या खूप वाढला आहे. आणि पोटावची चरबी कमी करण्यसाठी तो उत्तम आहे.
अशी करा ही एक्सरसाइज
१) स्टॅंडिंग रोल डाउन : ही एक्सरसाईझ करताना आधी सरळ उभे राहून श्वास घेत घेत दोन्ही हात वर घ्या. त्यानंतर हळूहळू श्वास सोडत पुढच्या बाजूने वाकावे. हे करत असताना पाठ समांतर करा. त्यांनतर हातचा आणि शरीराचा पुढचा भाग सरळ करून मागच्या बाजूने खुर्चीवर बसल्याच्या स्थितीत या. त्यांनतर सरळ उभे रहा. आणि हात बगलेत घ्या. असे कमीत कमी ३ वेळा करा.
२) थाई स्ट्रेच : हा व्यायाम करण्यासाठी अगोदर पाय फोल्ड करून गुडघ्यांवर बसा. नंतर डोक्यापासून पायांपर्यंत तुमचे शरीर सरळ ठेवा.आणि तुमचे दोनही हात खांद्याच्या समोर सरळ रेषेत ठेवा. दोन्ही हात खाली करा. मग शरीराचा वरील भाग मागच्या बाजूने ४५ डिग्रीपर्यंत वाकवा. असे कमीत कमीत ५ वेळा करा. यामुळे तुमची पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल.
३) बल लेग स्ट्रेच : हा व्यायाम करण्यासाठी चटईवर सरळ झोपा. तुमची मान जमिनीपासून जरावर उचला. मग दोनही हात मागच्या बाजूने घ्या. आणि पाय गुडघ्यापासून वाकवून छातीजवळ घ्या. आणि दोनही हातांनी पाय पकडा. अशी एक्सरसाइज ५ वेळा करा. हा व्यायाम केल्याने तुमच्या पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल. आणि तुम्ही फिट दिसाल.