आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केळे शरीरासाठी किती लाभदायक आहे, हे बहुतांश लोकांना माहित असते. परंतु, याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. अनेकांना वाटते की केळ्यामुळे वजन वाढते, म्हणून ते केळे खात नाहीत. परंतु, हा गैरसमज असून केळ्यामुळे वजन कमी होऊ शकते. केळ्याचे खरे फायदे जाणून घेतले तर तुम्ही ताबडतोब नियमित केळे खाण्यास सुरूवात कराल. यातील ग्लुकोजमुळे शरीराला तात्काळ उर्जा मिळते. यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि तांबे असे विविध लाभदायक घटक असतात.
* वजन कमी करण्यासाठी उपयोगी
केळे नियमित सेवन केल्याने वजन कमी होऊ शकतो. केळ्यामुळे आतड्यांची स्वच्छता होते. बद्धकोष्ठतेचा त्रासही यामुळे दूर होतो.
हे आहेत फायदे
१. केळे खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते. सतत पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे खाणे कमी होऊन वजन कमी होते.
२. यातील मॅग्नेशियममुळे मूड चांगला राहतो. चांगली झोप सुद्धा येते.
३. यातील फाइबरमुळे अन्नपचन व्यवस्थित होते.
४. शरीराला व्हिटॅमिन बी६ ची आवश्यकता असते. केळ्यातून याची पूर्तता होऊ शकते.
५. उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांसाठी केळे लाभदायक आहे.
६. यातील आयर्नमुळे अॅनिमियाचा धोका कमी होतो.
७. केळे खाल्ल्याने मुळव्याधीतही आराम मिळू शकतो.
८. यामुळे अॅसिडीटी दूर होते. तसेच पचनशक्ती वाढते. आताड्यांचे आजार दूर होतात.
९. आतड्यांची जखम यामुळे बरी होते. अल्सरचे बॅक्टेरियामुळे नष्ट होतात.
१०. डायरियामध्ये केळे लाभदायक आहे. दह्यासोबत दोन केळी खाल्ल्यास जुलाब, अतिसार यात आराम मिळतो.
११. यातील मॅग्नेशियममुळे केळे लवकर पचन होते. केळ्यामुळे मेटाबॉलिज्म सुधारते. कोलेस्टेरॉल कमी होतात.