‘या’ सवयी ठरु शकतात घाताक, आरोग्याचे होते नुकसान

aarogyanama-2

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : काही सवयी आपल्याला नकळत लागतात. शिवाय, त्यांच्याकडे आपण गांभिर्याने पहातही नाही. परंतु, याच सवयी नंतर आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतात. एकटेपणा जाणवणे, हातांना घाम येणे या लहान-लहान गोष्टी आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात. यामागे काही कारण असू शकतात. ही कारण ओळखणे खुप गरजेचे असते. आपल्यात काही चूकीच्या सवयी आढळून आल्या तर लगेचच त्या घालविण्यासाठी उपाय केले पाहिजेत. यासाठी तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता.

काही लोक हे स्वतःमध्ये खुश असतात. मोबाइल किंवा गॅजेटमध्येच वेळ घालवतात. या लोकांना इतरांसोबत बोलायला आवडत नाही. तर हा आजाराचा संकेत असू शकतो. हे डिप्रेशनमुळे होऊ शकते. अशा सवयींकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे. काही लोक एकदम हळू बोलतात. हे लोक तिरस्कारपुर्ण गोष्टीही आरामात बोलतात. नेहमी स्लो मोशनमध्ये बोलणा-या लोकांना ब्रेन स्ट्रोक किंवा ट्यूमरची समस्या होऊ शकते. यामुळे मेंदू सिग्नल पोहोचवू शकत नाही आणि बोलण्यात अडचणी येतात. तुम्ही काहीच मेहनत न करता. नेहमीच हळुहळू चालत असाल, नेहमी थकलेल्याची जाणीव तुम्हाला होत असेल. तर समजून घ्या की, काही तरी समस्या आहे.

नेहमी थकलेले राहणे हा एएलएसचा संकेत असू शकतो. हा मेंदूचा एक आजार आहे. तुम्हाला विनाकारण हातांच्या तळव्यावर घाम येत असेल. तर तुम्हाला थायराइड ग्लँड डिसऑर्डर असू शकतो. तसेच तुमचे वजन डायटिंग न करता.अथवा अंग मेहनत न करता अचानक कमी झाले तर समजून घ्या की, काही तरी समस्या आहे. अशा वेळी तातडीने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या.