आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पौष्टिक आहाराचा अभाव, चुकीच्या सवयी, जंक फूड, आदींमुळे कॅन्सरचा धोका होऊ शकतो. पौष्टीक आहार न घेतल्याने किंवा खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो. आहारात ग्रीन टी, डाळिंब आणि फ्लॉवर या पॉलिफनॉल भरपूर प्रमाणात असलेल्या भाज्यांचा समावेश केल्यास हा धोका टाळता येऊ शकतो, असे मेक्सिको येथील जनरल हॉस्पिटलमधील क्लिनिकल न्यूट्रिशन विभाग प्रमुख वेनेसा फुक्स यांनी म्हटले आहे.
हे लक्षात ठेवा
1 पॉलिफिनॉल तत्व भरपूर असलेल्या काही पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे न्यूरोडिजेनेरेशन कमी होते. वाढत्या वयाची गती कमी होते आणि कॅन्सरपासून बचाव होतो.
2 ज्या पदार्थांमध्ये पॉलिफिनॉलची कमतरता असते, त्यांचा ब्रेस्ट कॅन्सरपासून ते स्कीन, प्रोस्टेट, आतड्या आणि अन्न नलिकेचा कॅन्सरसोबत संबंध जोडला जातो. म्हणजे डाएटमध्ये पॉलिफिनॉल रिच नसेल तर कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो.
3 ग्रीन टी ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशी वाढण्यापासून रोखते.
4 डाळिंब प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींचा विकास कमी करतो.