Bad Cholesterol कमी करण्यासाठी मदत करतात ‘हे’ 3 ड्रिंक्स, शरीरातून बाहेर पडू लागते खराब कॉलेस्ट्रोल

Bad Cholesterol | drinking these 3 drinks can lower bad-cholesterol levels include tomato drink berries and soy milk in your diet

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Bad Cholesterol | शरीरात कोलेस्टेरॉल वाढले की आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. यापैकी एक म्हणजे हार्ट अटॅक. सध्या हार्ट अटॅक (Heart Attack) किंवा सडन कार्डियाक अरेस्टची अनेक प्रकरणे नोंदवली जात आहेत (Bad Cholesterol). अशावेळी, हृदयाच्या आरोग्याची (Heart Health) काळजी घेणे जास्त महत्वाचे आहे. कोलेस्टेरॉलचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो, त्यामुळे समस्या खूप वाढण्यापूर्वी कोलेस्टेरॉल कमी करण्याचे मार्ग शोधणे शहाणपणाचे आहे. खालील 3 प्रकारचे ड्रिंक कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात (Cholesterol Diet).

 

कोलेस्ट्रॉल कमी करणारे ड्रिंक (Drinks That Lower Cholesterol Levels)

1. टोमॅटो ड्रिंक (Tomato drink)
टोमॅटो ड्रिंक हे खरे तर टोमॅटोचा ज्यूस आहे, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स आढळतात. तसेच त्यात लायकोपीनचे प्रमाणही चांगले असते. याच्यातील नियासिन आणि फायबर हे कोलेस्ट्रॉल-कमी करणारे ड्रिंक बनवते. एका अभ्यासानुसार, टोमॅटोचा 280 मिली रस 2 महिने दररोज प्यायल्यास ते खराब कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) मोठ्या प्रमाणात कमी करण्यासाठी काम करते.

 

2. सोया मिल्क (Soy Milk)
सोया मिल्कमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण कमी असते. दररोज वापरत असलेले मलईदार आणि हाय फॅट दूध सोया मिल्कने बदलू शकतो. यामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यासोबतच आरोग्यालाही इतर अनेक फायदे मिळतील. फूड अँड ड्रग असोसिएशनने दैनंदिन आहारात सोया मिल्कचा समावेश करण्याची शिफारस केली आहे. हे दूध साधे पिण्याव्यतिरिक्त, तुम्ही विविध प्रकारचे शेक किंवा स्मूदी इत्यादी बनवून देखील ते पिऊ शकता. (Bad Cholesterol)

3. बेरीज ड्रिंक (Berries Drink)
कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी बेरीपासून तयार केलेले स्मूदी आणि शेक पिऊ शकता.
हे कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणाची देखील काळजी घेईल आणि घाणेरडे कोलेस्टेरॉल देखील शरीरातून बाहेर पडू लागेल.
बेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर असतात.
आहारात ब्लूबेरी, रास्पबेरी आणि स्ट्रॉबेरीचा समावेश करू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Bad Cholesterol | drinking these 3 drinks can lower bad-cholesterol levels include tomato drink berries and soy milk in your diet

 

हे देखील वाचा

 

Diabetes Warning Signs | हातावर दिसतात डायबिटीजची लक्षणे, तुम्हाला पण शुगरचा आजार नाही ना?

 

Bad Cholesterol | ‘ही’ एक गोष्ट खाल्ल्याने नसांमध्ये जमणार नाही ‘बॅड कोलेस्ट्रॉल’, आजपासून खायला करा सुरूवात

 

Bad Cholesterol Symptoms | शरीर देऊ लागलं ‘हे’ 4 संकेत तर समजा की धमन्यांमध्ये जमा झालंय बॅड कोलेस्ट्रॉल, येथे जाणून घ्या लक्षणं